घाटकोपर पश्चिम विभागातील भीमनगर तरुण मित्र मंडळ येथील गटाराचे पाणी कायमस्वरूपी रस्त्यावर !!
*आवश्यक ती कार्यवाही करून जनतेची या समस्या पासून सुटका करावी स्थानिक समाजसेवक शरद भावे यांची मागणी*
घाटकोपर, (शांताराम गुडेकर) :
बृहन्मुंबई मुंबई महापालिकेच्या एन वॉर्ड च्या अधिपत्यात येणाऱ्या घाटकोपर पश्चिम विभागातील भीमनगर तरुण मित्र मंडळ येथील गटाराचे पाणी कायमस्वरूपी रस्त्यावर वाहत असून येणाऱ्या -जाणाऱ्या शाळेतील मुलांना, जेष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला आणि अन्य प्रवाशी यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून विभागात यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे साथीचे रोगराई पसरली आहे. मच्छर /डास ची निर्मिती होत आहे. काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलेले आहे. त्यामुळे गटार बंद झाले. तरी या समस्याचा गांभीर्याने विचार करून संबंधीत लोकप्रतिनिधी, पालिका अधिकारी यांनी ही बाब लक्षात घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी व जनतेची या समस्या पासून सुटका करावी अशी मागणी स्थानिक समाजसेवक शरद भावे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment