Thursday, 8 February 2024

गुरुकुल कॉलेज ऑफ कॉमर्स येथील महिला विकास समिती व क्रिडा विभागाच्या वतीने ३ दिवसीय आत्मसंरक्षण प्रशिक्षिण शिबिर संपन्न !!

गुरुकुल कॉलेज ऑफ कॉमर्स येथील महिला विकास समिती व क्रिडा विभागाच्या वतीने ३ दिवसीय आत्मसंरक्षण प्रशिक्षिण शिबिर संपन्न !!

'अरबन फिटनेस' च्या  मुख्य प्रशिक्षका निकिता दांडेकर तसेच क्रिडा प्रशिक्षक संकेत कांबळे यांनी १५० विद्यार्थीनींना / युवतींना आत्मसंरक्षणचे दिले प्रशिक्षण 

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
             गुरुकुल कॉलेज ऑफ कॉमर्स येथील महिला विकास समिती व क्रिडा विभागाच्या वतीने ३ दिवसीय आत्मसंरक्षण प्रशिक्षिण शिबिर नुकतेच पार पडले. अरबन फिटनेस, वरळी, येथील प्रशिक्षकांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण सर्व युवतींना दिले गेले. आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचे हे सामाजिक कार्य करत असल्यामुळे समाजात महिला व युवतींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये नक्कीच घट होईल आणि महत्त्वाचे म्हणजे शासनावर तसेच पोलिस प्रशासनावर येणारा अतिरिक्त ताणतणाव देखील कमी होण्यास मदत होईल. 'आत्मसंरक्षण' हे काळाची गरज आहे. गरज ओळखून अशी शिबीर प्रत्येक विभागात होणे आवश्यकत आहे. समाजात वावरणाऱ्या विघातक प्रवृत्ती पासून स्वतःचा तसेच आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी या प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक महाविदयालयात महिला विकास समिती (WDC) अंतर्गत सर्व महाविदयालयीन युवतींच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचे शिबिर राबवणे गरजेचे आहे. या प्रशिक्षणासाठी महाविदयालयातील सुमारे १५० विद्यार्थीनीनी यामध्ये सहभाग घेतला. 

            'अरबन फिटनेस' च्या मुख्य प्रशिक्षका निकिता दांडेकर तसेच क्रिडा प्रशिक्षक संकेत कांबळे यांनी सलग ३ दिवस गुरुकुल महाविदयालयातील विद्यार्थीनींना / युवतींना आत्मसंरक्षण याचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात वाईट कृत्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या खूप लहान लहान व अतिशय सहज व महत्त्वाच्या युक्त्या शिकवून त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करवून घेतले. मार्शल आर्टस् व क्रिडा प्रशिक्षिका निकिता दांडेकर यांनी युवतींना स्वःताचा बचाव करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या युक्तीबाबत असणाऱ्या अनेक शंकांचे निरसन केले. तसेच या माध्यमातून विद्यार्थीनींना सदैव सतर्क राहण्याचे आवाहन केले. विद्यार्थीनींचा आत्म- विश्वास वाढवून त्यांना शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी, सुदृढ व सशक्त राहण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गुरुकुल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.ममता राणे, महिला विकास समिती प्रमुख संयोजिका कांचन लोतले, महिला विकास समितीचे सदस्य आणि स्वयंसेवक यांचे देखील सहकार्य लाभले. गुरुकुल महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी असेच उपक्रम सतत राबविण्याचा ठाम निश्चय दर्शवला.

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...