Wednesday, 7 February 2024

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भवानी चौक विभागीय शाखेच्या वतीने कुमारी राशी राकेश यादव हिचा सत्कार !!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भवानी चौक विभागीय शाखेच्या वतीने कुमारी राशी राकेश यादव हिचा सत्कार !!

कल्याण, प्रतिनिधी : अनुपम नगर, कल्याण येथील रहिवासी सौ. पुनम यादव यांची कन्या कु. राशी राकेश यादव यांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लाल किल्ल्यावर झालेल्या परेड मध्ये इस्रोच्या झांकी मध्ये सहभागी होण्याचा मान प्राप्त झाला या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भवानी चौक विभागीय शाखेच्या वतीने कुमारी राशी राकेश यादव हिचा घरी जाऊन सत्कार केला.

यावेळी विभाग प्रमुख सतिश वायचळ, उपशहर संघटक सोपान पोखरकर, सूरज पातकर, शाखाप्रमुख श्री विशात कांबळे, श्री कैलास भोईर विभाग संघटक श्री अरुण राऊळ, उप विभाग प्रमुख श्री प्रमोद शिंदे श्री सुरेन्द्र परब श्री दास जाधव जेष्ठ शिवसैनिक श्री लक्ष्मण सुपे, श्री भिकाजी कानागल, केशव कांबळे सोशल मीडिया प्रमुख कू अथर्व शिंदे शिवसैनिक श्री विजय गोवेकर, श्री रामनाथ सांगळे महिला आघाडीच्या सौ जया जाधव, सौ ममता जाधव, सौ चेढे ताई, सौ प्रिती, शिवसैनिक तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

इस्रो सारख्या संस्थेच्या माध्यमातून कुमारी राशी हिला देशाच्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होता आले ही समस्त कल्याणकर, अनुपम नगर व विभागासाठी आभिमानाची बाब आहे असे विभाग प्रमुख श्री सतीश वायचळ यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...