कल्याण पंचायत समितीचे कर्तव्यनिष्ठ गटविकास अधिकारी अशोक भवारी यांची सिन्नर येथे बदली !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीचे कार्य कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असलेले गटविकास अधिकारी अशोक भवारी यांची अखेर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पंचायत समिती येथे बदली झाली आहे, त्यांच्या बदलीने जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी व तालुक्यातील नागरिकांमध्ये 'कही खुशी कही गम, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
३ संप्टेंबर २०२१ या कालावधीत शहापूर येथून अशोक म़ंगलदास भवारी यांची बदली कल्याण पंचायत समिती येथे झाली, पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कामे कशी करुन घ्यायची याबत श्री भवारी यांचा कोणीही हात धरू शकत नाही. यामुळे ते निष्ठूर, आहेत अशीच भावना सर्व कर्मचाऱ्यांमधून ऐकायला मिळत असे, हे जरी खरं असलं तरी वेळेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी जाहीर कौतुक देखील केले आहे. कल्याण तालुक्यात पदभार स्वीकारल्यानंतर स्वच्छता अभियान, घरकुल योजना, जलजीवन मिशन, अथवा इतर तत्सम कामात कल्याण नेहमी अग्रेसर राहिले आहे, याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डेप्युटी सीईओ, आदींनी मान्य केले आहे. टेबलावर एकही कागद दिसता कामा नये, लोकांची कामे पेंडिग राहता कामा नये, नागरिकांच्या तक्रारींची ताबडतोब दखल त्यांचे समाधान करणे आदी मुळे यांच्या कार्यकाळात तक्रारीचे प्रमाण नगण्य होते, त्यांनी आतापर्यंत पंचायत समितीचे वरीष्ठ अधिकारी, विस्तार अधिकारी, कर्मचारी, आदींना नोटीस बजावली असून कित्येक ग्रामसेवकांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदला पाठविले आहेत, यामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या बद्दल आकस, राग असणं स्वाभाविक आहे, परंतु आपण शासनाचा पगार घेतो, त्यामुळे काम हे करावेच लागेल असे म्हणून ते केलेल्या कार्यवाहीचे समर्थन करीत असतात.
कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी हे कर्मचाऱ्यांसाठी वादग्रस्त ठरत असले तरी नागरिकांसाठी मात्र कार्य, कर्तव्यनिष्ठ, हजरजबाबी, लाभकारक ठरले आहेत. त्यांच्या वैद्यकीय तसेच कौटुंबिक अडचणी मुळे त्यांना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर किंवा इगतपुरी येथे बदली हवी होती. यासाठी त्यांना खूप वाट पहावी लागली, पण आज अखेरीस त्यांची बदली नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून झाली आहे. एक लोकाभिमुख प्रशासन चालवणारा चांगला अधिकारी कल्याण तालुक्यातून जाणार याचा खेद नागरिकांना वाटतो तर त्यांच्या सोयीनुसार बदलीचे ठिकाण त्यांना उशिरा का होईना मिळाले यांचे समाधान देखील वाटते, म्हणूनच अशोक भवारी यांची बदली ही कल्याण करांसाठी कही खुशी कही गम अशी आहे.
प्रतिक्रिया -
**अविनाश फडतरे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, साप्र, जिल्हा परिषद ठाणे) __
अहवाल देण्यामध्ये कल्याण बीडिओ नेहमीच अग्रेसर राहिले, स्वतःचे आजारपणाचा कधीच इश्यू केला नाही, प्रशासनावर मजबूत पकड असलेला गटविकास अधिकारी म्हणून अशोक भवारी यांची ओळख निर्माण झाली होती.
No comments:
Post a Comment