Friday, 15 March 2024

ठाणे जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायती मधून दोन वेळा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळालेल्या कल्याणातील 'जांभूळ, ग्रामपंचायतीकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष, अद्याप गुणगौरव समारंभ नाही !

ठाणे जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायती मधून दोन वेळा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळालेल्या कल्याणातील 'जांभूळ, ग्रामपंचायतीकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष, अद्याप गुणगौरव समारंभ नाही !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीने सन २०२०/२१, २१/२२ आणि आता २०२२/२३ अशी सलग ३ वर्षे आर आर पाटील (आबा) जिल्हा सुंदर गाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभिमान आदी विविध स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय, असे पुरस्कार प्राप्त केलेल्या या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ, कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला जिल्हा परिषदेचे प्रशासन अथवा पालकमंत्री यांना विसर पडला की काय? असा प्रश्न जांभूळ ग्रामपंचायतीचे सरपंच परिक्षित पिसाळ यांनी उपस्थित केला असून याबद्दल त्यांनी प्रशासना विषयी उघड नाराजी व्यक्त केली.

ठाणे जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायती आहेत, शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने विविध स्पर्धेचे प्रत्येक वर्षी आयोजन केले जाते. त्यानुसार संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२०,/२१ व २०२१,/२२ अंतर्गत राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा, सन, २०२१-२२ मध्ये स्मार्ट ग्राम आणि आता म्हणजे सन २०२२'-२३ मध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत, जिल्हा पातळीवर, प्रथम, द्वितीय असे पुरस्कार कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीला मिळाले, सुमारे ५० लक्ष रुपयांचे पुरस्कार मिळाले, रक्कम मिळाली, मात्र हे करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, परीक्षित पिसाळ, उपसरपंच अशोक शिंदे, सदस्य सुमन पिसाळ, सुनिता गोरे, ज्योती जाधव, गुलाब मुकणे, रेखा गायकवाड, अक्षय सावंत, राजाराम मुकणे, ग्रामसेवक, राजाभाऊ सुरवसे, तत्कालीन ग्रामसेवक, बाळू कोकणे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी खूप मेहनत, कष्ट, घेतले होते, जेव्हा जेव्हा तसापणी पथक येईल, तेव्हा त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी ही ग्रामपंचायत घेत होती, त्यामुळे पैशापेक्षा आमच्या पाठीवर पालकमंत्री अथवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडून कौतुकाची थाप पडावी, केलेल्या कामाची शाबासकी मिळावी ऐवढी मापक अपेक्षा यांची आहे,

नुकतेच जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने जिल्हा आणि पंचायत समिती स्तरावरील १६ कर्मचाऱ्यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते दिली व हा गुणगौरव सोहळा पार पाडला, मात्र आमच्या जांभूळ ग्रामपंचायतीकडे गेल्या २/३ वर्षांपासून का दुर्लक्ष होत आहे, आमचे काम कौतुकास्पद नाही का? असा प्रश्न सरपंच परीक्षित पिसाळ यांनी उपस्थित करून जिल्हा प्रशासनावर जाहीर नाराजी व्यक्त केली. तर अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात ग्रामपंचायती शासनाच्या विविध अभियानात, उपक्रमात, स्पर्धेत भाग घेईल का? त्यांना प्रोत्साहन कसे मिळेल असा सवाल उपसरपंच अशोक शिंदे यांनी विचारला आहे, तर याबाबत जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांना विचारले असता ते म्हणाले, आदर्श ग्रामसेवक आणि स्मार्ट ग्राम पुरस्कार सोहळा हा एकत्र घेण्याचा विचार सुरू आहे, अशा ग्रामपंचायतीचा गौरव झालाच पाहिजे तशी परवानगी घेऊन लवकरच हा सोहळा पार पडेल, असे ते म्हणाले, त्यामुळे सब्र का फल मीठा होता है, असे म्हणण्याची वेळ आम्ही जांभूळकर यांच्या वर यावी हिच अपेक्षा.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...