Friday, 15 March 2024

इंदौर येथे २२ मार्च रोजी माजी सैनिकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन !

इंदौर येथे २२ मार्च रोजी माजी सैनिकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन !

पुणे, प्रतिनिधी : पुनर्वसन महासंचालक कार्यालय (डीजीआर), माजी सैनिक कल्याण विभाग, संरक्षण मंत्रालय यांच्यामार्फत २२ मार्च रोजी  गॅरिसन मैदान, इन्फंट्री म्युझियम जवळ, मॉल रोड, महू, इंदौर-४५३४४९ येथे माजी सैनिकांच्या पुर्नरोजगार आणि पुनर्वसनासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

नोकरीसाठी इच्छुक असणारे पात्र माजी सैनिक आणि उद्योग क्षेत्रातील नियोक्ते यांच्यात थेट आणि त्वरित संवाद साधणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. इच्छुक माजी सैनिकांनी माजी सैनिक ओळखपत्र, बायोडेटाच्या पाच प्रती व छायाचित्रासह उपस्थित राहावे. 

अधिक माहितीसाठी सहसंचालक, नवी दिल्ली  दूरध्वनी क्रमांक ०११-२०८६२५४२ व  पुनर्वसन  महासंचालक  कार्यालय लखनौ, भ्रमणध्वनी क्रमांक ९४६८८९८२५८ किंवा ७०६५५०२७०८ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...