Tuesday, 5 March 2024

विवा महाविद्यालयात लसीकरण !!

विवा महाविद्यालयात लसीकरण !!

कर्करोग म्हटलं की मनात भीती निर्माण होते. जगभरातील स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर हा खूप चिंतेचा विषय आहे. स्त्रियांमध्ये सामान्यत: हा कर्करोग चौथ्या क्रमांकावर आहे. संपूर्ण जगात जानेवारी महिना सर्व्हायकल कर्करोगाबाबत जागृती महिना म्हणून पाळला जातो.

साधारण हा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) यामुळे होतो. आज या कर्करोगापासून वाचण्यासाठी लस निर्माण झाली आहे. मात्र या लसीबद्दल हवी तशी जनजागृती झाली नाही. ह्याच पार्श्वभूमीवर कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन, विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट विरार, पालघर अकॅडमी ऑफ पीडीअट्रिक्स, विरार मेडिकल असोसिएशन, यंग स्टार्स ट्रस्ट, विरार आणि भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ४ मार्च २०२४ रोजी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) वॅक्सिनेशन कॅम्प विरार पश्चिमेच्या  विवा महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये घेण्यात आला.

गर्भाशयाच्या कर्करोगाच्या लसीकरण शिबिराच्या आयोजनासाठी विरार मेडिकल असोसिएशन तसेच यंग स्टार्स ट्रस्ट विरार ह्यांनी उत्तम नियोजन केले होते. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून लस उपलब्ध करण्यात आली आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनच्या सहकार्याने विवा महाविद्यालय, उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालय, उत्कर्ष मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळेतील जवळपास १३०० मुलींना हे  लसीकरण देण्यात आले. 

सदर लसीकरण शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी डॉ. प्रवीण क्षीरसागर, डॉ. शैलेश बारुड तसेच विरार मेडिकल असोसिएशनची संपूर्ण टीम आणि यंग स्टार्स ट्रस्ट समन्वयक अजीव पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक हार्दिक राऊत आणि इतर सर्व पदाधिकारी ह्यांनी आयोजन आणि नियोजनामध्ये सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...