Monday, 4 March 2024

कल्याण मुरबाडवासियांची अखेरीस धुळीतून मुक्तता नाहिच, रस्त्यावरील धुळवडीनंतर गावागावात राजकीय 'शिमगा ?

कल्याण मुरबाडवासियांची अखेरीस धुळीतून मुक्तता नाहिच, रस्त्यावरील धुळवडीनंतर गावागावात राजकीय' शिमगा ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण मुरबाड महामार्गावरील म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान दिडदोन वर्षे चिखल, खड्डे, धुळ, इत्यादींच्या त्रासामुळे नरक यातना भोगल्यानंतर एकदाचा हा रस्ता सिंमेट काँक्रीटीकरण झाला, यानंतर तरी म्हारळ, वरप, कांबा या परिसरासह या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांची सुटका होईल असे वाटत असतानाच आता पुन्हा पाचवामैल ते पुढे मुरबाडच्या दिशेने रस्त्याचे काम सुरू झाले असून यावर वेळेत पुरेसे पाणी मारत नसल्यामुळे धुळीचे लोट उठत आहेत, यामुळे कल्याण मुरबाड वासियांची धुळितून मुक्तता नाहिच, तर रस्त्यावरिल धुळवडीनंतर आता गावागावात निवडणुकीचा राजकीय 'शिमगा, सुरु झाला आहे.

कल्याण मुरबाडच्या महामार्गावर म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान सिंमेट काँक्रीटीकरण चे काम ठेकेदाराने सुरू केले, मात्र अनंत अडचणीमुळे हे काम तब्बल एक ते दोन वर्षे सुरू राहिले, या काळात, धुळ, चिखल, खड्डे, पाणी तुंबने आदी मुळे शेकडो लोकांना त्रास झाला, खड्ड्यांच्या अपघातामुळे काहिंचा जीव गेला तर अनेकांना अपंगत्व आले. तसेच धुळीमुळे बहुतांश नागरिकांना श्वसनाचे, डोळ्यांचे आजार जडले, ऐवढ्यानंतरही अद्याप हा रस्ता पुर्ण झाला नाही.

असे असतानाच याच रस्त्यावर पाचवामैल ते बापसई पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा खोदकाम सुरू केले आहे. तर रायते येथे मुख्य रस्ता खोदून वळण रस्ता तयार केला आहे. परंतु हे करत असताना कुठे ही पाणी मारले जात नाही, गाड्यांच्या वर्दळीमुळे धुळीचे लोट हवेत उडत आहेत, तसेच रस्ता खोदकामामुळे वाहतूक कोंडी होत आहे, सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने धुळ व वाहतूक कोंडी याचा त्रास, मुलांना, पालकांना, नागरिकांना होत आहे. मात्र याचे कोणालाही सोयरसुतक दिसत नाही. त्यामुळे काही दिवस, महिने, वर्षे सुध्दा कल्याण मुरबाड या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना धुळवडिचा सामना करावा लागणार आहे. यामुळे मुरबाड रेल्वे बहुत दूर हे, लेकिन 'धुळ, नजदिक है, असे मिश्कील पणे बोलले जात आहे.

दरम्यान रस्त्यावरील या धुळवडीनंतर आता लोकसभेच्या निवडणुकीचा गावागावात राजकीय शिमगा सुरू झाला आहे, नेत्यांच्या बँनरबाजीने कोपरे, चौक, व्यापले जात आहेत, आपला नेता, आपला पक्ष कसा चांगला ५ वर्षे त्यांनी लोकासाठी काय काय केले ते पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. घरोघरी विविध टिव्ही चँनेल वर मोदींची 'गँरटी, लोकावर थोपविली जात आहे. तर निर्भय बनो या झंझावातामुळे सत्ताधारी यांचे पितळ उघडे पाडले जात आहे. या कार्यक्रमाची चर्चा गावागावात होत आहे. गावातील सार्वजनिक ठिकाण, कट्टा, पार, चौक येथे भाजपाची फोडाफोडी, उध्दव ठाकरे यांची जहरी टिका, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या बद्दल संताप, वंचित च्या भूमिकेबद्ल संशय, काँग्रेसचे नेतृत्व यावर खमंग चर्चा, शाब्दिक बाचाबाची, ऐकायला मिळत आहे, एकूणच शिमगोत्सव काही दिवसानंतर असला तरी राजकीय शिमगा मात्र जोरदार सुरू आहे.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...