Wednesday, 3 April 2024

गारगाव येथील वणव्यामध्ये जळालेल्या घरांच्या कुटुंबीयांना तत्काल घरकुले द्यावेत, आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेने प्रशासनाकडे केली मागणी !!

गारगाव येथील वणव्यामध्ये जळालेल्या घरांच्या कुटुंबीयांना तत्काल घरकुले द्यावेत, आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेने प्रशासनाकडे केली मागणी !!

जव्हार, जितेंद्र मोरघा :

वाडा तालुक्यातील गारगाव येथे गवताला वणवा लागल्याने त्या वणव्याचा भडका प्रचंड वाढला त्यामळे नजीकच आदिम कातकरी जमातीच्या वस्तीला आग लागुन त्यामध्ये ९ घरे जळुन खाक झाली त्यामध्ये रेशनकार्ड, आधारकार्ड, जातीचे दाखले, मुलांचे शाळेचे दाखले व इतर महत्वाचे कागदपत्रांसह घरातील अन्नधान्य पुर्णपणे जळुन खाक झाले आहेत, सदर ९ कुटुंब ही आदिवासी आदीम कातकरी जमातीची असुन ही सर्व रोजंदारी - विटभट्टीवर काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरविर्वाह करतात परंतु काल लागलेल्या आगीत या ९ कुटुंबाचा संसार हा उघड्यावर पडला आहे. या घटनेची माहिती कळताच आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी घटना स्थळी भेट देवुन त्या ९ कुटुंबांची विचारपुस केली तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती वाडा यांची भेट घेवुन सदर घटनेची माहिती दिली व प्रशासनाने त्या कुटुंबीयांना तातडीने मदत द्यावी अशी विनंती केली.सदर घरे पुर्णपणे आगीमध्ये खाक झाल्यामुळे पावसाळ्यापुर्वी या आदिम कुटुंबीयांना घरकुले मंजुर करावी या संदर्भात गट विकास अधिकारी पंचायत समिती वाडा यांना विनेदन देवुन मागणी केली.

** यावेळी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना वाडा तालुका उपाध्यक्ष संतोष जांजर, वाडा शहर सचिव नरेश ठाणगे, प्रल्हाद जांजर हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...