Wednesday, 3 April 2024

उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात पक्ष प्रवेश करून हाती शिव बंधन बांधत भाजपावर केली सडकून टीका !!

उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात पक्ष प्रवेश करून हाती शिव बंधन बांधत भाजपावर केली सडकून टीका !!

भिवंडी, दिं,३, अरुण पाटील (कोपर) :
            लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर न झाल्यानं भाजपामध्ये राज्यात पहिली बंडखोरी झाली आहे. जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी मातोश्री येथे शिवसेना बाळा साहेब ठाकरे गटात प्रवेश करून हाती शिव बंधन बांधून  भाजपावर सडकून टीका केली आहे.
            खासदार उन्मेष पाटील म्हणाले, " मी केलेल्या विकास कामांची भाजपाला किंमत नाही. मी प्रमाणिकपणे कामं केले आहे. काम करताना गट, तट, जात आणि धर्म मी पाहिलं नाही. मी बदल्याच्या आणि सूडाच्या राजकारणाला कंटाळलो. आमदार आणि खासदार होणं हे माझं उद्दिष्ट नव्हते. प्रामाणिक कार्यकर्त्यांची घुसमट होते. जे भाजपात सुरू, त्या पापाचे आम्ही धनी होता कामा नये. मान-सन्मान नको. पण स्वाभिमानाने तरी जगता आले पाहिजे. कार्यकर्त्यांची अवहेलना होते. हे घातक आहे. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना वाढवू आणि मशाल पेटवणार आहोत. माझी कुठलीही अट नाही. खासदारकीच्या आशेनं मी आलो नाही."
             खासदार संजय राऊत म्हणाले, "उन्मेष पाटील आणि त्यांचे सहकारी यांचे शिवसेनेत स्वागत आहेत. उन्मेष पाटील हे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवारही आणि पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचे स्वागत आहे. शिवसेना निष्ठावंतांची कदर करते."
            उद्धव ठाकरे म्हणाले, " उन्मेष पाटील मी तुमचे स्वागत करतो. तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत. भाजपाची वापरा आणि फेकून द्याची वृत्ती आहे. तुम्हा प्रवाहाच्या विरोधात उडी मारली आहे. हा प्रवाह जन भावनेचा आहे. तुम्ही मोठे धाडस केले. आज माझ्याकडे काही नाही. जे होते त्यांनी गद्दारी करुन नेले. तुम्ही सत्ता आणण्यासाठी शिवसेनेत आलात. आपलं ध्येय एकच आहे, महाराजांचा अस्सल भगवा जळगावात फडकवायचा आहे. तुमच्यासारख्यांना भाजपाने वापरुन फेकून दिलंय. तुम्ही आज राज्याला दिशा दाखवून दिलंय. फसगत करणाऱ्यांना यापुढे निवडून द्यायचे नाही."
             मा.उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार मा.संजय राऊत यांची मंगळवारी भेट घेतली होती. जळगाव हा शिवसेनेचा (ठाकरे गट) बालेकिल्ला मानला जात होता. सध्या तेथील सर्व आमदार सत्ताधारी महायुतीचे आहेत

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...