एका हातात हंडा आणि दुसऱ्या हातात दांडा !!
जव्हार, जितेंद्र मोरघा :
जव्हार चालतवड येथे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकत्यांनी ** एक हातात हंडा आणि दुसऱ्या हातात दांडा" असा मोर्चा जव्हार तालुक्यातील कार्यक्रत्यांनी विवेक पंडित यांच्या नेतृत्वात आपल्या आजच्या सभेत केले. जव्हार तालुक्यात चालतवड येथे जाहीर सभा पार पडली.
या सभाना मोठ्या प्रमाणात गर्दी होती. जलजीवन मिशन योजनेत जाहीर केल्या प्रमाणे प्रत्येकाला नळाने स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळायला हवे यासाठी आता संघटना आणि संघर्ष याशिवाय पर्याय नाही असे पंडित यांनी सांगितले. यावेळी पंडित यांनी सांगितले की स्वप्नातही नसेल कुणाच्या अशी योजना म्हणजे जलजीवन मिशन ही देशाच्या पंतप्रधानांनी निधीच्या स्वरूपात प्रत्यक्षात आणली आहे. म्हणूनच प्रत्येक झोपडीत, घरात, झापात, बंगल्यात, प्रत्येक गरीब, श्रीमंत प्रत्येक नागरिकाला नळाने स्वच्छ पाणी मिळायचा अधिकार असून तो मिळत नसेल तर काढण्याशिवाय पर्याय नाही आणि ही लढाई लढणाचा श्रमजीवीचा निर्धार पक्का असल्याचे पंडित यांनी सांगितले.
जल जीवन मिशन योजनेच्या मनमानी आणि गैरव्यवहार विरोधात श्रमजीवी संघटना आता प्रचंड आक्रमक होताना दिसत आहे. जव्हार मोखाडा तालुक्यात ठराविक गावात जाऊन जाहीर सभा घेऊन जलजीवन मिशन बाबत जनजागृती करणार आहेत. मंगळवारी जव्हार तालुक्यात दोन तर मोकळा तालुक्यात एक अशी विवेकपणे त्यांची सभा झाली या सभेमध्ये विवेक पंडित यांनी जल जीवन मिशन योजनेबाबत पंतप्रधानांचा महत्त्वाकांशी प्रकल्प कसा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी आणि गैरव्यवहार करण्याच्या धोरणाने धुळीस मिळत आहे. या पुढेही मोर्चे ** एक हातात हंडा आणि दुसऱ्या हातात दांडा” असे काढायचे, ठरले आहेत.
जव्हार तालुक्यात चोथ्याचीवाडी आणि मोखाडा तालुक्यातील डोल्हारी येथे झालेल्या सभेमध्ये विवेक पंडित यांनी जलजीवन मिशन योजना काय आहे. पाणी प्रत्येक माणसासाठी किती महत्त्वाचा आहे आणि पाण्याचा अधिकार घेण्यासाठी कसा संघर्ष करावा लागेल याबाबत लोकांना प्रेरणा देणारे भाषण केलं यावेळी पंडित यांनी अत्यंत धक्कादायक माहिती लोकांसमोर आणली.
जलजीवन मिशनच्या पाण्याचे काम करताना पाण्याचे स्त्रोत निवडण्यापूर्वी तिथे भूगर्भ जलशास्त्रज्ञ यांचा प्रत्यक्ष पाहणी केलेला अहवाल असणे क्रमप्राप्त आहे. ज्या ठिकाणी हे अहवाल दिले गेले आहेत, मात्र तरीही तेथील विहिरी या कोरड्या पडलेल्या आहेत. याचाच अर्थ असा की हे जे भू गर्भजल शास्त्रज्ञांनी दाखले दिले आहेत, हे दाखले ऑफिसात बसून चिरीमिरी घेऊन, गैरव्यवहार करून दिलेले दाखले असून ते ऑथेंटिक दाखले नाहीत. याचाच परिणाम पूर्ण योजना फेल ठरवून लोकांचा पाण्याचा अधिकार हिरावून घेतला जात असून शासनाच्या कोट्यावधी रुपयाचा चुराडा होत आहे असा आरोप पंडित यांनी केला.
श्रमजीवी संघटनेने आणि प्रत्येक नागरिकांनी मग तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असू देत प्रत्येकाने या पाण्याच्या लढ्यामध्ये या चळवळीमध्ये रस्त्यावर उतरले पाहिजे असं आवाहन विवेक पंडित यांनी केले. श्रमजीवी संघटनेचे सध्या जिल्हा भरात प्रत्येक ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चे निघत आहेत, रिकामा हंडा घेऊन येथील सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर ठळक देऊन आपल्या पाण्याचा अधिकार मागत आहे हा मोर्चा केवळ हंडा मोर्चा नसावा तर यापुढे निघणारे सगळे मोर्चे एका हातात हंडा आणि एकाचा दांडा असा असावा असे आवाहन यावेळी पंडित यांनी केले. आपल्या हातात तीन फुटाचा असलेला दांडा हा कोणाला मारण्यासाठी नसून तर आपल्या गावातील जल जीवन योजनेचे काम हे इस्टिमेट प्रमाणे झाले आहे का?
येथे टाकलेली पाईपलाईन ही जमिनीच्या आत तीन फुटापर्यंत खोलवर टाकलेली आहे का हे तपासण्याचं काम प्रत्येकाने करायचं आहे. ते तपासण्यासाठी तीन फूट लांबीचा दांडा आपण हातात ठेवायचा आहे असे पंडित यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment