Saturday, 6 April 2024

जन्म ठेपेची शिक्षा भोगणारा कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ 'डॅडी' याची होणार मुदतपूर्व सुटका , न्यायालयानं सरकारला दिले 'निर्देश !

जन्म ठेपेची शिक्षा भोगणारा कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ 'डॅडी' याची होणार मुदतपूर्व सुटका , न्यायालयानं सरकारला दिले 'निर्देश !

भिवंडी, (कोपर), दिं,६. अरुण पाटील :
         मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मोठा दिलासा दिलाय. तो सध्या शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्ये प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मात्र आता त्याची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
          शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मोठा दिलासा दिलाय. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले. 
          २००६ च्या एका शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॅान अरुण गवळीकडून शिक्षेतून सुट देण्याची मागणी करण्यात आली होती. अरुण गवळीच्या त्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, कोर्टानं निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयानं अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासन आणि गृह विभागाला ४ आठवड्यांचा अवधीही दिलाय.
           शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेच्या शिक्षेत १४ कारावास भोगल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीनं उर्वरित शिक्षा माफ करावी, याकरिता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अरुण गवळीनं वयाची ७१ वर्षे पूर्ण केल्याच्या कारणावरुन मुदतपूर्व सुटकेसाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. २००६ च्या शासन निर्णयाच्या आधारे जर एखाद्या कैद्यानं एकूण शिक्षेपैकी जर १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा पूर्ण केली असेल तर बंदिवान मुदतपूर्व सुटका होण्यास पात्र असल्याचा दाखल दिला होता.
            शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची मुंबईत २ मार्च २०० मध्ये हत्या झाली होती. रात्रीच्या वेळी कमलाकर जामसांडेकर हे घरी असताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी पोलिसांनी अरुण गवळीला अटक केली होती, तेव्हापासून तो कारागृहात बंद आहे.
           मारामारी, अपहरण, खून यांसारख्या अत्यंत गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये अडकलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यावर्षी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून पदवीधर झालाय. आपली सत्ता आणि वर्चस्व कायम ठेवण्यासाठी गुंडगिरीमध्ये 'पदव्युत्तर' राहिलेल्या अरुण गवळीला नागपूरच्या कारागृहात शिक्षणाचं महत्त्व उमगलं होतं. त्यामुळं त्यानं नागपूर मध्यवर्ती कारागृहात राहून पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय.
          जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना १४ वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यावर, तसंच त्यांचं वय ६५ पेक्षा जास्त असेल तर तुरुंगातून सोडता येईल. गवळीचा जन्म १९५५ चा असल्यानं त्याचं वय सध्या ७१ वर्षे आहे. कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी २००७ पासून तुरुंगात असल्यानं त्यानं गेली सोळा वर्ष तुरुंगवास भोगलाय.

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...