Monday, 8 April 2024

आरोग्य दुत पुरस्काराने कृष्णा कदम सन्मानीत !!

आरोग्य दुत पुरस्काराने कृष्णा कदम सन्मानीत !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

              वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष कृष्णा कदम यांचा जय भवानी मित्र मंडळांच्यावतीने माजी विशेष महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या हस्ते आरोग्य दूत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शांतीदूत परीवार अध्यक्षा तृषाली जाधव, सुरेश दादा सकपाळ, प्रकाश कदम, रवींद्र शिंदे, प्रविण महाडीक, दत्ता केसरकर, रवींद्र केसरकर व ग्रामस्थ उपस्थित होते. कृष्णा कदम हे गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात राहून रुग्णांसाठी वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी कार्य करत आहेत. गेल्या तीन वर्षापासून त्यांनी ग्रामीण भागातील रुग्णांना मुंबईत रुग्णालयात उपचार मिळावे यासाठी एक संघटना बनवली असून त्या वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने ते रुग्णांसाठी कार्य करत आहेत. आतापर्यंत हजारोहून अधिक रुग्णांना त्यांनी मदत कार्य केले आहे. त्याच्या या कार्याची दखल घेतली जात असून जय भवानी मित्र मंडळाकडून त्यांना यंदा आरोग्य दूत हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...