Tuesday, 9 April 2024

शिवसेना - उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे (शाखा क्रमांक १२३/१२४) तर्फे गुढीपाडवानिमित्त भव्य मिरवणूक सोहळा संपन्न !!

शिवसेना - उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे (शाखा क्रमांक १२३/१२४) तर्फे गुढीपाडवानिमित्त भव्य मिरवणूक सोहळा संपन्न !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
                शिवसेना-उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे (शाखा क्रमांक १२३/१२४) दरवर्षी प्रमाणे कै. सुधीरभाऊ मोरे (मा. नगरसेवक) यांचा वारसा जपत सुनिल मोरे व मा. नगरसेवीका स्नेहल सुनील मोरे यांनी विक्रोळी पार्क साईटतर्फे गुढीपाडवानिमित्त भव्य मिरवणूक सोहळा मंगळवार दि.०९ एप्रिल २०२४ रोजी थाटामाटात संपन्न झाला. सानेगुरुजी चौक आनंदगड, पार्कसाईट येथून या गुढीपाडवानिमित्त भव्य मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली होती. या मिरवणूकमध्ये शाखेच्या महिला, पुरुष, युवक - युवती,शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, ग्रा.सं.कक्ष पदाधिकारी, अंगीकृत संघटना पदाधिकारी तसेच शिवसैनिक, युवा सैनिक तसेच विभागातील जनतेने सहभाग घेतला. मा.नगरसेविका सौ‌ स्नेहल मोरे, उपविभाग प्रमुख सुनील मोरे, समन्वयक शिवाजी शेवाळे, शाखा प्रमुख प्रकाश भेकरे, संतोष सवणे, प्रतीक्षा पवार, कमळ चिचपुरे, संगीता तुळसक, ग्राहक संरक्षण कक्ष वार्ड संघटक श्री यशवंत खोपकर, राजेंद्र पेडणेकर, श्रीकांत चिचपुरे, सागर फुलसुंदर, संतोष तुळसकर, संभाजी नेर्लेकर आदी मान्यवरसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...