Sunday 2 June 2024



कल्याण रेल्वे स्टेशन जवळील निलम गल्ली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, या ठिकाणी अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू झाले असून अगदी राजरोसपणे गाळे भाड्याने घेऊन त्यात ऑनलाईन लॉटरी, जुगार चे सर्व प्रकार सुरू झाले आहेत.

त्यामुळे परिसरात जुगाऱ्यांचा वावर वाढला असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिक व इतर व्यावसायिकांना होत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे याकडे पोलिसांचे होणारे दुर्लक्षही चर्चेचा विषय बनला आहे.

महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुरवातीपासूनच कुप्रसिद्ध असलेली नीलम गल्ली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या निवडणूकीच्या काळात ते बंद झाले होते. त्यामुळे स्थानिकांसह इतर व्यावसायिकांना दिलासा मिळाला हाेता. मात्र काही दिवसांपासून परिसरातील अवैध धंदे पुन्हा खुलेआम सुरु झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. अवैध धंदे चालकांनी परिसरातील सुधांशू चेंबर येथील गाळ्यांमधे टेबल मांडले आहेत. त्यावर खुलेआम अवैध जुगाराचे डाव मांडले असून युवावर्गाचा घोळका टेबलाभोवती दिसत आहे. तर काही मोठ्या रकमेचा जुगार खेळण्यासाठी आतमध्ये प्रशस्त जागा उपलब्ध करून दिल्याचेही आढळून आले. त्यात कुलर, एसीचीही व्यवस्था असल्याचे दिसते. त्यामुळे युवावर्गास जुगाराकडे वळवण्याचे प्रकार खुलेआम सुरु झाल्याचे दिसते.

या परिसरात मोठ्या प्रमाणावर फळे व भाजीपाला विकाणारे फेरिवाले, हॉटेल्स तसेच अनेक व्यावसायिक इमारती असून येथे महिला, तरुणी यांचा सुध्दा मोठा वावर असतो.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...