नालासोपारा विधानसभेत विशेष मतदार नोंदनी मोहिम....
नालासोपारा ता, ०९ :- स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या वतिने संपुर्ण नालासोपारा विधानसभेत विशेष मतदार नोंदनी मोहिमेचे आयोजन समेळपाडा येथुन करण्यात आले आहे.
पहिल्याच दिवशी शेकडो नागरीकांनी मतदार कार्ड दुरूस्ती नविन नोंदनी केली. मतदार यादीत मतदार म्हणुन नोंदनी झालेली नाही अशा वंचितांसाठी मतदार नोंदनी मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत ऐन निवडणूकीच्या दिवशी नालासोपारा विधानसभा मतदार संघातील सुमारे हजारो पारंपारिक मतदारांची नावे गायब झाल्याची बाब निदर्शनास आली होती. याच पार्श्वभूमीवर स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या वतिने मतदार नाव नोंदणी अभियान राबविले जात आहे,
निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळेच मतदारांची नावे यादीतून गायब झाली आहेत. ती पुन्हा नोंदवून घेण्याचा स्वराज अभियान च्या वतिने प्रयत्न असेल. हे अभियान संपूर्ण नालासोपारा विधानसभा मतदार क्षेत्रातील विविध ठिकाणी राबविले जाणार आहे. अभियानाचा जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना महिला शहर प्रमुख रूचिता नाईक यांनी केले आहे.
यावेळी शिवसेना म उपशहर संघटक आशा सातपुते, महिला विभाग प्रमुख स्मिता वैद्य उपविभाग प्रमुख सुजाता जाधव, शाखा प्रमुख वंदना ढगे, उपशहरप्रमुख महेश निकम यांचे विशेष सहकार्य लाभले....
No comments:
Post a Comment