Wednesday, 10 July 2024

आनंदवाटा प्रतिष्ठान व पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप यांच्या मदतीने संस्थेच्या ७ व्या वर्धापनदिन वृक्षारोपण करून साजरा !!

आनंदवाटा प्रतिष्ठान व पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप यांच्या मदतीने संस्थेच्या ७ व्या  वर्धापनदिन वृक्षारोपण करून साजरा !!

ठाणे, प्रतिनिधी : आनंदवाटा प्रतिष्ठान व पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप यांच्या मदतीने संस्थेच्या ७ व्या  वर्धापनाचे औचित्य साधत पारसिक टेकडी कळवा, ठाणे येथे वृक्षारोपण करण्यात आले. एकूण २५ करंजाची रोपटे लावण्यात आली. त्याचे कारण असे की, आपल्या भागातील हवामानात करंज झाडाची वाढ चांगली होते तसेच या झाडाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व स्थान आहे. शासनाचा देखील वन महोत्सव आता चालू आहे. तापमान वाढ व पाणीटंचाई यामुळे झाडे लावण्यासोबतच त्यांचे संगोपन करणे हे देखील महत्त्वाचे आहे. 

पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप वर्षभर पारसिक टेकडीवर झाडे लावून त्यांचे संगोपन देखील करत असते. चांगलं काम करणाऱ्या संस्था बरोबर आनंदवाटा प्रतिष्ठान नेहमी स्वतःला त्यांच्याशी जोडून घेऊन वर्षभर पर्यावरण व शैक्षणिक उपक्रम राबवितात. या वेळेच्या उपक्रमात तरुण मुलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.  पारसिक हिल ट्रि प्लांटेशन ग्रुप व उपस्थित तरुण मुलांचे आनंदवाटा  तर्फे कृतज्ञता व्यक्त  करून  " साथी हात बढाना, एक अकेला थक जायेगा, मिलकर पेड लगाना "हे  गाणे सर्वांनी सामूहिक रित्या गाऊन वृक्षारोपण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशी माहिती संस्थेचे सभासद रवींद्र निर्मला तानाजी ह्यांनी दिली.

1 comment:

  1. खुप छान उपक्रम 👍

    ReplyDelete

घाटकोपर पश्चिम विधानसभेत भव्य शोभा यात्रेने गणेश चुक्कल यांच्या प्रचाराची सांगता !!

घाटकोपर पश्चिम विधानसभेत भव्य शोभा यात्रेने गणेश चुक्कल यांच्या प्रचाराची सांगता !! घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभ...