गिरगावच्या साहित्य संघात उत्कंठावर्धक "शक्ती - तुरा" सामन्याचे आयोजन !!
** कुणबी युवक मंडळ तालुका म्हसळे तर्फे स्तुत्य उपक्रम ; समाज बांधवांना एकसंघ करण्याचे उद्दिष्ट
मुंबई - ( दिपक कारकर )
कोकणी माणसाच्या कानाकणात - मनामनात भरलेली लोककला म्हणजे शक्ती - तुरा होय.अगदी पुराण काळपासून आदी अनादी ही लोककला, हे नृत्य पाहायला मिळते. कोकणच्या मातीत जन्मलेल्या अनेक कलावंत मंडळींनी ह्या कलेचे प्रामाणिकपने जतन, संवर्धन केले आहे. ह्या कलेत काळानुरूप बदल झाला, तरी मुख्य गाभा तोच असून ग्रामीण सह मुंबई रंगभूमीवर असंख्य आयोजने, सादरीकरण पहावयांस मिळतात. लोककलेच्या आयोजनातून सामाजिक सौख्य राखण्याच्या एकमेव उद्देशाने कोकणच्या दोन होतकरू आणि तरुण कलावंतांचा पाहण्यासारखा कार्यक्रम संयोजित केला आहे.
म्हसळा तालुक्यातील ठाकरोली गावाला सन १९६० साली लागलेल्या आगीमुळे तालुक्यातील संपूर्ण कुणबी समाज संघटित झाला आणि शाखेची निर्मिती करण्यात आली. मागील अनेक वर्षाच्या समाज उभारणीत बऱ्याच जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी आपले बहुमोल असे योगदान दिले आहे, त्यामुळेच म्हसळा तालुक्यातील कुणबी समाज आज यशोशिखरावर आहे.सर्वांचा नामोल्लेख शक्य नसला तरी म्हसळा तालुक्याला लाभलेले समाजनेते कै.एस.डी.शिंदे साहेब यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. समाज्याचे २४ वर्ष अध्यक्ष,तालुक्याचे २० वर्ष सभापती आणि १२ वर्ष उपसभापती अशी पदे भुषवलेले शिंदे साहेब यांनी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अतोनात प्रयत्न केले. या नंतरही अनेक समाज धुरीणांनी तालुक्यात प्रवासाची योग्य साधने उपलब्ध नसताना ही समाजातील अनिष्ट चालीरिती ना बदलण्यासाठी विभागवार बैठका, दौरे करून समाज जागृत ठेवण्यात आला.
ग्रामीण ठिकाणी तालुका म्हसळा येथे समाज्याचे भव्यदिव्य आणि देखणे असे समाज सभागृह बांधले आहे. तसेच मुंबई ठिकाणी सुद्धा आपले समाज कार्यालय असावे असे बऱ्याच वर्षाचे स्वप्न ही पूर्णतःवास गेले आहे. मुंबईतील प्रसिद्ध हिरे बाजार असलेल्या ऑपेरा हाऊस सारख्या मोक्याच्या ठिकाणी समाज कार्यालय काही वर्षांपूर्वीच घेतले आहे,यासाठी प्रत्येक समाज बांधवानी शक्य होईल तेवढा आर्थिक हातभार लावला आणि त्यामुळेच हे शक्य होऊ शकले.
मागील ६० वर्षात समाज धुरीणांच्या अथक समाज सेवेतून समजभीमुख अशी बरीच कामे झालेली आहेत.प्रतिवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करणे, विद्यार्थी गुणगौरव सोहळा सोबतच करियर मार्गदर्शन शिबीर, आजीव सभासद नोंदणी मोहीम, युवासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, समाजासाठी मार्गदर्शन शिबीर असे एक ना अनेक उपक्रम राबवत असते.
या सर्वच सामाजिक कार्यात युवा पिढीसुद्धा अग्रेसर पणे सहभाग घेत आहे ही सुद्धा आनंदाची बाब आहे. २०१७ साली प्रथमच मुंबई ठिकाणी तालुका संलग्न कुणबी युवक मंडळ मुंबई स्थापन करण्यात आले आणि युवक अध्यक्ष पदी श्री अनिल काप यांची निवड करण्यात आली तेव्हापासूनच युवक मंडळ सुद्धा जोमाने कामाला लागले आहे. २०२४ मध्ये तालुका नविन कार्यकारिणी निवड झाल्यानंतर तालुका अध्यक्ष श्री महेंद्र टिंगरे आणि सचिव श्री राजुजी धाडवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना एकत्र यावे तसेच आर्थिक बाबतीत ही समृद्ध व्हावे हा उद्देश ठेवून रविवार दि.१४ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वा.साहित्य संघ मंदिर ( गिरगाव - मुंबई ) येथे कुणबी युवक मंडळ अध्यक्ष रुपेश भोगल, सचिव उमेश पोटले, प्रचारक महेंद्र घडशी तसेच संपूर्ण युवक कार्यकारिणी यांच्या अथक प्रयत्नाने उत्कंठावर्धक शक्ती - तुरा जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. शक्तिवाले शाहीर म्हणून म्हसळा तालुक्यातील प्रसिद्ध कवी, गीतकार, शाहीर उमेश पोटले विरुद्ध तुरेवाले शाहीर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्र,सहित सांस्कृतिक क्षेत्रातील नव्या दमाचं नाव गीतकार/शाहीर विकास लांबोरे अशी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.ह्यावेळी चिखलप,तळवडे, ठाकरोली आणि संदेरी या चारही विभागातील समाज बांधव कार्यक्रम हाऊसफुल्ल करण्याचा निर्धार केला असून,अनेक समाज बांधवानी उपस्थित राहून कार्यक्रमाचा सहपरिवार मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ,( मुंबई ) शाखा तालुका म्हसळा, संलग्न महिला मंडळ, क्रिडा मंडळ व ह्या उपक्रमाचे सर्वेसर्वा असणारे कुणबी युवक मंडळ तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रुपेश भोगल - ९७७३७३७३५७ / महेंद्र घडशी - ८०९७७६९०६६ यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment