Monday, 1 July 2024

शिवसेना (उबाठा) शिव आरोग्य सेनातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, टागोर नगर, विक्रोळी पूर्व येथे डॉक्टरांचा सत्कार !!

शिवसेना (उबाठा) शिव आरोग्य सेनातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, टागोर नगर, विक्रोळी पूर्व येथे डॉक्टरांचा सत्कार !!

मुंबई, (शांताराम गुडेकर)
           शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ.किशोर जी ठाणेकर व महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडु (दादा) सकपाळ यांच्या सूचनेनुसार आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा असे समजून आपले चोख कर्तव्य बजावणार्‍या डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १ जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. नागरिकांचे व समाजाचे आरोग्य सदृढ ठेवणाऱ्या डॉक्टरांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, टागोर नगर, विक्रोळी पूर्व येथे शिव आरोग्य सेनेच्यावतीने रुग्णालयाचे डीन सर डॉ.जितेंद्र जाधव, डॉ.वर्षा मेढे, डॉ.नीलम गेडाम,ज्ञडॉ.विनोद कुमार, डॉ.योगेश भालेराव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन ऋण व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी शिव आरोग्य सेनेचे भांडुप पश्चिम विधानसभा समन्वयक श्री.अजिंक्य भोसले, सह समन्वयक सौ.सारिका यादव, सक्षम महिला मंडळ अध्यक्ष पूजा दळवी, आरोग्य सेनेचे प्रभाग क्र.११४ समन्वयक श्री.संजय घोसाळकर, सह समन्वयक सौ.अमेया पार्टे, सौ.नम्रता मयेकर, फार्मसी सेल चे विधानसभा अध्यक्ष श्री.स्वप्निल शिणकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

'पडघे ' गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा !

'पडघे ' गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा !  आमच्या आयुष्याचं केलं सोनं  देहाचे झिजून केले चंदन... ज्ञानाच्या महासागराला  अ...