Monday 1 July 2024

शिवसेना (उबाठा) शिव आरोग्य सेनातर्फे राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार !!

शिवसेना (उबाठा) शिव आरोग्य सेनातर्फे राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
               शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ.किशोर जी ठाणेकर व महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडु (दादा) सकपाळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयातील ईएनटी सर्जन डॉ.देविका शेरे, भूल विभागाचे प्रमुख डॉ.रीना नेबू व डॉ.सोप्रिया येंपले या डॉक्टरांच्या टीमने अवघ्या सात महिन्यांच्या बाळाने गिळलेल्या तीन चाव्यांचा संच श्वासनलिका आणि धमन्यांना असलेला धोका पत्करून अत्यंत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळवल्या बद्धल या पूर्ण टीम तसेच वैद्यकीय अधीक्षिका डॉ.भारती राजुलवाला, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री सचिन पायनवर यांचा डॉक्टर दिनानिमित्त शिव आरोग्य सेनेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिव आरोग्य सेनेचे मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक श्री.अमोल वंजारे, मुंबई जिल्हा सचिव सौ.ज्योतीताई भोसले, शिवडी विधानसभा समन्वयक श्री.नंदकुमार बागवे घाटकोपर विधानसभा (पश्चिम) सह समन्वयक श्री.जयेश पवार, अंधेरी विधानसभा सह समन्वयक श्री.महेश केणी, शिवसैनिक श्री.अजिंक्य वाणी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यभर आंदोलन, हजारो पत्रकार आले रस्त्यावर !!

व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यभर आंदोलन, हजारो पत्रकार आले  रस्त्यावर !! ** आता तरी शासनाचे डोळे उघडणार काय?  मुंबई (प्रतिनिधी) : ‘व्ह...