आषाढी एकादशीनिमित्त नालासोपारात विविध धार्मिक कार्यक्रम....
** स्वराज अभियानचा कार्यक्रमांनी शहर विठ्ठलमय...
नालासोपारा :- आषाढी एकादशीनिमित्त स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या वतीने नालासोपारा विधानसभा मधिल समेळगाव येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने…
संपूर्ण महाराष्ट्राची श्रद्धा व अभिमान असलेला सन म्हणजे आषाढी एकादशी. या सणाचे महत्व व आपल्या प्रथा परंपरा जपण्याचा व विठ्ठल भक्तांचा आनंद द्विगुणीत करण्याच्या उद्देशाने नालासोपारातील समेळगाव येथे भजन, किर्तन, मोफत तुळस रोप व खिचडी प्रसाद वाटप, स्वराज अभियान च्या वतिने करण्यात आले. किर्तन, भजन करित विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
दिंडीत विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले. पांडुरंगाला अत्यंत प्रिय असलेल्या तुळशीच्या रोपांचे व साबुदाना खिचडी प्रसाद वाटप समेळगाव येथे करण्यात आले. त्यास विठ्ठलभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विठ्ठल भक्ताक॔डुन स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी जेष्ठ पत्रकार रविंद्र माने, शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक, ऊपशहरर प्रमुख महेश निकम, आशा सातपुते, वंदना ढगे, आशा वालिवकर, रूचिदा माने, रिया भुवड, पूजा गुप्ता, शालिनी सनंसे, सुरेखा साबळे, निलम सावंत, दीक्षा नारकर, उज्ज्वला गाडगिल, इंदु गुप्ता, हेमलता वैती, सुरेखा कारंडे यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम उत्साहात पार पाडले....
No comments:
Post a Comment