स्वराज नागरी सेक्टर - २ को. ऑप. हौ. सोसायटीच्या आंबिवली (कल्याण) येथील समस्यांसंदर्भात शिवसेना (उबठा) राष्ट्रीय संघटक अरुण तिवारी यांनी केली आयुक्तांकडे तक्रार !!
शिवसेना (उबठा) यांनी आमचा पक्ष सत्तेत असताना नागरिकांच्या समस्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून तातडीने सोडविल्या जात पण हे सरकार पराभवाच्या भितीने निवडणूक घेत नाही यामुळे संपूर्ण महानगरपालिकेचा कारभार हा प्रशासन बघत आहे व ठेकेदार सुध्दा सत्तेत असलेल्या सरकारशी संबंधित आहेत. स्थानिक अधिकारी व ठेकेदार यांचा मुजोरपणा व जनतेप्रती उदासिनता यामुळे संपूर्ण महानगरपालिकेचा कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असे सांगितले. अरुण तिवारी यांनी माननीय आयुक कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना लिखित स्वरूपात तक्रार देत त्वरित समस्यांचे निराकरण व योग्य ती कारवाई करण्याचे सुचित केले आहे.
No comments:
Post a Comment