Tuesday, 16 July 2024

आता बेरोजगार युवकांना भरघोस विद्यावेतनासह सहा महिने मिळणार अनुभवाची संधी !!

आता बेरोजगार युवकांना भरघोस विद्यावेतनासह सहा महिने मिळणार अनुभवाची संधी !!

▪️मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन 

▪️अर्जासाठी संकेतस्थळ 
www.rojgar.Mahaswayam.gov.in/#/register
नागपूर, प्रतिनिधी : राज्यातील असंख्य युवकांना आपले शिक्षण पूर्ण करुन नोकरीसाठी अनुभवाच्या शोधात वनवन फिरावे लागते. युवकांना विद्यावेतनासह आपण घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली असून बारावी पास, आयटीआय, पदविका आणि पदविधर किंवा पदव्युत्तर युवकांनी या योजनेच्या लाभासाठी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कौशल्य विभाग यांनी केले आहे. 

बारावी पास विद्यार्थ्यांना प्रतिमहा सहा हजार, आयटीआय/पदविका उत्तीर्ण युवकांना आठ हजार व पदविधर/पदव्युत्तर युवकांना दहा हजार असे भरघोस विद्यावेतन दिले जाणार आहे. हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने दर महा अदा केले जाईल, असे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. 

या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. याचबरोबर उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 35 वर्ष असावे. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा. त्याची आधार नोंदणी आवश्यक असून बँक खातेही आधारशी संलग्न असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या आस्थापनांना पुढे यायचे आहे त्या आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास विभाग‌ येथे संपर्क साधता येईल. 

No comments:

Post a Comment

घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिम मधील विकास कामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी आला होता तो गेला कुठे ?

घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिम मधील विकास कामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी आला होता तो गेला कुठे ?  ** घाटकोपर पश्चिम मध्ये बदल मी घडव...