Monday, 5 August 2024

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्नी - महाराष्ट्र शासनाने लक्ष घालावे: चोपडा येथे इशारा मोर्चा !!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्नी - महाराष्ट्र शासनाने लक्ष घालावे: चोपडा येथे इशारा मोर्चा !!

चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दोन महिन्याचा संपकाळात मानधनवाढ देण्याबाबत दिलेले आश्वासन अजून पाळलेले नाही म्हणून महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये हा असंतोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून चोपडा येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन तर्फे इशारा मोर्चा काढण्यात आला, या मोर्चाचे नेतृत्व कामगार नेते का अमृत महाजन, ममता महाजन, प्रतिभा पाटील, वैशाली पाटील, गुप्त्यार तडवी, देवश्री कोळी यांनी केले प्रकल्प कार्यालयावर मोर्चाचे निवेदन प्रकल्प एक व प्रकल्प दोन यांच्यावतीने वरिष्ठ सुपरवायझर श्रीमती रत्नमाला शिरसाट व पूनम ठाकरे  यांनी स्वीकारले.

मागण्या अशा ..
१) महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती सोबत सरकारने १२/०७/२०२४ रोजी जी काही बोलणी केली त्या नुसार आयुक्तांनी दिलेल्या प्रस्ताव अंगणवाडी सेविका यांना १०००० रुपये तर मदतनिस यांना ७५००रुपये मानधन वाढ द्यावी तसेच पेन्शन लागू व्हावी.
 
२) सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सेवानिवृत्त सेविका मदतनीस यांना ग्रॅच्युइटी  द्यावी. 

३)सेवानिवृत्त सेविकांचे मदत दिवसांचे एक रकमेला साधा करा.

४) गेल्या संप काळातील दोन महिन्याच्या  कपात पगार मानधन अदा करावे.

५)मोबाईल हाताळणीचा प्रोत्साहन भत्ता गेल्या दोन वर्षापासून मिळालेला नाही तो अदा करावा.

६) रखडलेला इंधन भत्ता त्वरित आदा करावा. 

७) दहावी पास मदतीसांना सेविका पदाच्या रिक्त जागी पदोन्नत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात ताबडतोब प्रतिज्ञापत्र सादर करून पदोन्नतीची केस निकाली काढावी व रखडलेल्या पदोन्नतीच्या मार्ग मोकळा करावा

८) अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आजारपणाची रजा लागू करावी

९) सेवानिवृत्तांचे निवृत्ती लाभ आदा करावेत ज्यांची माहिती पाठवलेली आहे त्यांची यादी कार्यालयासमोर लावावी जेणेकरून पारदर्शकता निर्माण होईल .

१०) मोबाईल  वाढीव रिचार्ज दर मिळावेत 

११) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या गणवेश हा बदलून मिळावा

१२) जेथे दहावी पास मदतीस नाही तेथे सेविका सरळ भरती करून रिक्त जागा भरा.. 

या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून सरते शेवटी प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे की या प्रश्नावर १३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेवर विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे ...

मोर्चा यशस्वी करण्यासाठी ठगूबाई पाटील, सिंधुबाई पाटील, हिराबाई महाजन, प्रगती ढिवरे, शोभा कोळी, उषा पाटील, निर्मला सांगोरे, कविता महाजन, सुलोचना पाटील, मनीषा पाटील आदी ५०/६० भगिनी व कॉम्रेड गोरख वानखेडे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिम मधील विकास कामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी आला होता तो गेला कुठे ?

घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिम मधील विकास कामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी आला होता तो गेला कुठे ?  ** घाटकोपर पश्चिम मध्ये बदल मी घडव...