Monday, 5 August 2024

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे शक्ती-तुरा व विविध क्षेत्रातील व्यक्तींचा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन !!

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे शक्ती-तुरा व विविध क्षेत्रातील व्यक्तींचा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

          कोकणातील नमन व कलगी तुरा लोककला आणि लोककलावंतांना मुबंई रंगमंचावर हक्काचं व्यासपीठ देत, विविध कार्यक्रमाच्या आयोजनात अव्वल स्थानी असलेली, कला क्रीडा सामाजिक पटलावर अग्रेसर असणारी "श्री पाणबुडी देवी कलामंच (मुंबई)" पाचेरी सडा (गुहागर) या संस्थेच्या वतीने शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात दमदार अस यश संपादन करणाऱ्या युवा युवतींना अस्सल चवीचा "कोकण कट्टा" संचालक प्रमोद गांधी पुरस्कृत "आदर्श युवा पुरस्कार २०२४" ने गौरविण्यात येणार असून, पुढीलप्रमाणे युवा युवती, "आदर्श युवा पुरस्कार २०२४" प्रति निवड करण्यात आली आहे. १) प्रसन्ना अनिल जागकर - ( महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड ) गाव - मु.पो.कोडंकारूळ ता. गुहागर, जि रत्नागिरी, २) करुणा रविंद्र मटकर- ( B. Com LLB - कायदा परीक्षा उत्तीर्ण ) गाव- चुनाकोळवण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ३) अनन्या विजय खेराडे - ( स्टार प्रवाह वाहिनीवर छोटे उस्ताद पर्व - ३ मध्ये ; गायन कलेतुन पदार्पण ) गाव-आबिटगाव, ता. चिपळूण, जि.रत्नागिरी, ४) स्नेहल विनायक शिगवण - ( मुलींमधून प्रथम क्रमांक - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिस भरती निवड ) गाव-कोतळूक,ता. गुहागर,जि.रत्नागिरी, ५) अपूर्वा दिपक वेलुंडे ( M. Sc. Biochemsitry Grade - A परीक्षेत यश ) गाव - असोरे, ता. गुहागर, जि.रत्नागिरी, ६) दिपक महादेव वाघे - ( गुहागर तालुक्यातील सुप्रिमो चषक सर्व पर्व खेळणारा एकमेव खेळाडू ) गाव - तवसाळ, तांबडवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी, अशा विविध स्पर्धा परीक्षेत, विधी, क्रीडा, कला क्षेत्रात घवघवीत यश संपादन करणाऱ्या तसेच प्रशासकीय पटलावर उच्च पदावर निवड झालेल्या युवा युवतींची निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार बुधवार दि.०७ ऑगस्ट २०२४ रोजी रात्रौ ०८ वा. मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले ( पूर्व ) मुंबई येथे श्री पाणबुडी देवी कलामंच आयोजित जुन्या सोन्याला, नवा उजाळा, शक्ती-तुऱ्याचा जंगी सामना शक्तीवाले शाहीर विजय पायकोळी आणि तुरेवाले शाहीर दिनेश डिंगणकर यांच्या होणाऱ्या जुगलबंदी कार्यक्रमादरम्यान, प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे पुरस्कृत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर संपर्क प्रमुख अध्यक्ष तसेच कोकण कट्टा संचालक प्रमोद गांधी आणि कोकण कट्टा संचालिका प्रियांका गांधी यांची ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभणार असून, विविध क्षेत्रातील दिगज मान्यवर सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे अधिकृत माहिती उपरोक्त संस्थेचे सर्वेसर्वा दिपक कारकर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिम मधील विकास कामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी आला होता तो गेला कुठे ?

घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिम मधील विकास कामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी आला होता तो गेला कुठे ?  ** घाटकोपर पश्चिम मध्ये बदल मी घडव...