Friday 9 August 2024

माणगाव तालुका बौद्ध समाज समन्वय समितीच्या माध्यमातून १५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील तमाम बौद्ध समाजाच्या आमसभेचे आयोजन !!

माणगाव तालुका बौद्ध समाज समन्वय समितीच्या माध्यमातून १५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील तमाम बौद्ध समाजाच्या आमसभेचे आयोजन !!

आमसभेत 'सामाजिक विकासा'च्या दृष्टीने अनेकविध विषयांवर चर्चा ....

** सामाजिक ऐक्य व उत्थानासाठी समन्वय समितीचे अहर्निश प्रयत्न
   
       बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १ : ३० वा. रोहिदास समाज सभागृह माणगांव येथे संपूर्ण माणगांव तालुक्यातील तमाम बौध्द समाजाच्या आमसभेचे आयोजन माणगांव तालुका बौद्ध समाज समन्वय समितीचे विद्यमान अध्यक्ष तथा माणगाव चे गोल्ड मॅन एडव्होकेट मा. यशवंत गंगावणे साहेब अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. 

      तरी सदर बौद्ध समाज आमसभेस संपूर्ण माणगांव तालुक्यातील बौद्ध समाजातील सर्व सामाजिक संघटना बौद्धजन पंचायत समिती, बौद्ध महासभा आणि त्यांचे आजी माजी पदाधिकारी, धम्म उपासक, उपासिका यांनी वेळेवर उपस्थित रहावे अशी माणगांव तालुका बौद्ध समाज समन्वय समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून विनंती करण्यात आली आहे. 

-: सदर आमसभे पुढील विषय :-

१ ) समाजाची जागा ताब्यात घेवून तिला तार कंपाऊंड करणे बाबत चर्चा
२ ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ११७/२० च्या केस बाबत विचार विनिमय करणे व योग्य निर्णय घेणे.
३) समाजाच्या मालकीची एम्बुलन्स तथा रुग्णवाहिका घेण्या बाबत चर्चा 
४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे बसवण्या बाबत चर्चा करणे. 
५ ) समाजाच्या मालकीची व हक्काची बँक तयार करणे. 
६ ) सुशिक्षित युवा बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा. घेवून उद्योजक बनवणे.... 
     अ) युवा बेरोजगारांना नगर पंचायत हद्दीत स्टॉल उपलब्ध करणे.
      ब) सुशिक्षित बेरोजगारांना ड्रायव्हिग लायसन्स मिळवून देणे.
७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर बदनामी केस संदर्भात व अन्य विषयासाठी डॉ. बाबासाहेब सांस्कृतिक सभागृह माणगांव याची सभेसाठी मागणी केली असता सभागृह उपलब्ध करून न देणे. या गंभीर विषयावर चर्चा करणे.
८) अध्यक्षांच्या परवाणगीने आयत्या वेळचे विषय.

      आपणांस कल्पना आहे, मागील तीन महिन्या पुर्वी माणगांव तालुका बौध्द समाज समन्वय समितीची स्थापना केली आहे. हि समन्वय समिती म्हणजे संपूर्ण तालुक्यातील विखुरलेल्या बौद्ध समाजाला एक विचार प्रवाहात जोडणे. व त्यांच्या मध्ये समता, बंधुता व शांतता निर्माण करून सामाजिक सलोखा निर्माण करणे. माणगांव मध्ये भावी पीढीसाठी आदर्श अश्या कार्याची निर्मीती करणे. समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी सदैव जागृत राहून त्यांच्या हक्क अधिकांरासाठी लढा उभा करणे. समाजातील अंतर्गत वाद-विवाद तसेच, बहुजन समाजात उद्भवणारी जातीयतेढ दूर करून होणाऱ्या आर्थिक व मानसिक त्रासापासून समाजाला वाचवण्याचे काम सदर माणगांव तालुका बौद्ध समाज समन्वय समितीने केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या केसचा ४ वर्ष प्रलंबित असणारा विषय मंत्रालयात जावून धसाला लावण्याचे काम सदर समन्वय समितीने केले आहे. अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समन्वय समितीला समाजाचे पाठबळ असणे आवश्यक आहे. म्हणून समाजाला एकत्रित करून सामाजिक न्यायाचा लढा उभारण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. म्हणून तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना, संस्था, बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव चे आजी माजी पदाधिकारी व तिच्या अंतर्गत असलेल्या सर्व उप शाखांचे आजी माजी पदाधिकारी, माणगाव तालुका बौद्ध महासभेचे आजी माजी पदाधिकारी व त्यांच्या उप विभागीय शाखा त्यांचे आजी माजी पदाधिकारी, बौद्ध उपासक, उपासिकांनी या आमसभेस आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन माणगाव तालुका बौद्ध समाज समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 

      टिप : माणगांव तालुका अतंर्गत गाव पातळीवरील तंटा मुक्त अभियान चालवणे बाबत. तक्रारी अर्ज सदर सभेत स्वीकारुनआगामी काळात योग्य उपाय योजना आखल्या जातील.

No comments:

Post a Comment

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !!

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !! *कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही*         *-...