Thursday 8 August 2024

जागतिक आदिवासी दिनानिमित्त गुणगौरव सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन !

जागतिक आदिवासी दिनानिमित्त गुणगौरव सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन !

नागपूर, दि. 8 : जागतिक आदिवासी दिनानिमित्त गुणगौरव सोहळा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन उद्या दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर या कार्यक्रमाचे उद्घाटक असतील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.च्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे असतील.

कार्यक्रमाला पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, आदिवासी  विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य शाळा, शासकीय वसतिगृह व नामांकित शाळेतील वर्ग दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरण, पारंपारिक आदिवासी नृत्य इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !!

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !! *कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही*         *-...