Thursday, 8 August 2024

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी अर्ज आमंत्रित !

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी अर्ज आमंत्रित !

नागपूर, प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती शेतजमीन शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  

योजनेसाठी दारिद्रयरेषेखालील विधवा व परित्यक्ता स्त्रिया आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनुसूचित जातीच्या अत्याचारग्रस्तांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या व्यक्तींनी योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर याच्या कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आयटीआयसमोर, श्रध्दानंदपेठ नागपूर येथे संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...