Thursday 8 August 2024

संविधान अमृत महोत्सवी वर्षा निमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्र च्या माध्यमातून ९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर संविधान जागर यात्रेचे आयोजन !!

संविधान अमृत महोत्सवी वर्षा निमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्र च्या माध्यमातून ९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर संविधान जागर यात्रेचे आयोजन !!

       बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा अमृत महोत्सव सुरु असून याच अभिमानास्पद क्रांतिकारक अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधित' संविधानाचा ' गजर घराघरात पोहचावा म्हणून येत्या 9 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर असा महाडचे ऐतिहासिक चवदार तळे ते भिम अनुयायांचे शक्तिपीठ असलेली दादरची चैत्यभूमि अशी संविधान जागर यात्रा निघणार असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संविधान जागर यात्रेचे उदघाटन होणार आहे.         
       सदर संविधान जागर यात्रेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती एडव्होकेट वाल्मिक निकाळजे यांनी दिली. या वेळी त्यांच्या सोबत संयोजक जयभिम आर्मीचे प्रदेश अध्यक्ष नितीन मोरे, राजेंद्र गायकवाड, संजय कांबळे, शरद कांबळे, योजना ठोकळे, स्नेहा भालेराव, आकाश अंभोरे उपस्थित होते. या संदर्भात जयभिम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष नितीन मोरे पुढे म्हणाले कि, महाराष्ट्र राज्यातील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील सुमारे 250 विविध पक्ष, संघटना, संस्था, मंडळे यांनी एकत्रीत येऊन काही बैठकांद्वारे चिंतन करून संविधान जागर समिती, महाराष्ट्र स्थापन केली असून त्याच माध्यमातून हि संविधान जागर यात्रा ९ ऑगस्ट ला सुरू होणार आहे. यास भारतीय जनता पार्टी व महायुतीचे घटक पक्ष यांचा संपूर्ण पाठींबा आहे. तसेच राज्यातील फुले- शाहू-आंबेडकरी विचाराचे आण्णा भाऊ साठे विचाराचे आणि आदिवासी भटके व विमुक्त संघटना व चळवळी आणि विचारवंत लेखक, साहित्यीक यांचाही सक्रिय पाठिंबा आहे. 
       भारताचे संविधान व त्यातील मौलिक व मूलभूत तत्वे, संविधान कधीच कोणीच बदलू शकत नाही याची संविधानातच असलेल्या भक्कम तरतूदी याबद्दल समाजाची व्यापक जागृती करण्यात येणार असून त्याबद्दलचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्याय निवाडे याची सविस्तर माहिती समाजाला देण्यात येणार आहे. भारताचे संविधान भारतात लागू झाल्यापासून ज्या ज्या चुकीच्या घटना दुरुस्त्या (संविधान संशोधने) ज्यांनी केल्या आणि संविधानातील मूलभूत आधिकारांची चौकट व लोकशाही यांची हत्या करून ती कायमची नष्ट करून देशावर जबरदस्तीने हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करणार्यांचे संपूर्ण पोलखोल या संविधान जागर यात्रेद्वारे करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

प्रशांत यादव यांच्या सारख्या कर्तृत्ववान नेतृत्वा च्या पाठीशी ठामपणे उभे रहा - शरद पवार यांचे सभेतून कार्यकर्त्यांना आवाहन

प्रशांत यादव यांच्या सारख्या कर्तृत्ववान नेतृत्वा च्या पाठीशी ठामपणे उभे रहा - शरद पवार यांचे सभेतून कार्यकर्त्यांना आवाहन  ** शरद पवार यांच...