Saturday 17 August 2024

ग्राम विकास मंडळ ताम्हणमळा मुंबई - पुणे यांच्या वतीने गावातील विद्यार्थी गुणगौरव व प्रवेशद्वाराचा उदघाटन सोहळा संपन्न !!

ग्राम विकास मंडळ ताम्हणमळा मुंबई - पुणे यांच्या वतीने गावातील विद्यार्थी गुणगौरव व प्रवेशद्वाराचा उदघाटन सोहळा संपन्न !!

मुंबई - निलेश कोकमकर 

       चिपळूण तालुक्यातील दुर्गम भागात  आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं ताम्हणमळा हे गाव. ह्या गावातील ग्रामस्थांनी आणि मुबंई- पुणे सारख्या शहरातील होतकरू तरुणांनी व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आणि जेणे करून आपल्या गावाचा चांगला उद्धार होईल, काही सुखसोयी करता येईल ह्या हेतूने ग्राम विकास मंडळ ताम्हणमळा मुंबई - पुणे हे मंडळ स्थापन केले. त्या प्रमाणे ग्राम विकास मंडळ ताम्हणमळा मुंबई - पुणे हे मंडळ शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक काम करत आहे. दरवर्षी नवीन नवीन उपक्रम राबवत गावातील रहिवाशी यांना एकत्रित करण्यास प्रयत्न करत आहे. प्रति वर्षा प्रमाणे ह्या ही वर्षी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आणि  यावेळी प्रथमच गावातील सर्व विद्यार्थी एकत्रित आले हे दृश्य पाहून गावातील ग्रामस्थ देखील सुखावून गेले. 
         प्रति वर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील ग्रामस्थ मान्यवर,मुंबई-पुणे मंडळ अध्यक्ष उदय  कदम, विद्यार्थी, पालक वर्ग यांच्या उपस्थित विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.सत्कार सोहळयाची सुरुवात दीप प्रज्ज्वलन करुन झाली. तद नंतर विद्यार्थी बालसभा पार पडली. ही सभा म्हणजे विद्यार्थी भाषण सहित अध्यक्ष भूषविणे सूत्रसंचालन करणे एक वेगळा अनुभव पहायला मिळाला. आलेल्या सर्व मान्यवर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मंडळाची प्रस्तावना  सचिव रणजित एकनाथ वरवटकर यांनी केली. ग्रामस्थ मनोगत झाल्यावर विद्यार्थी यांस भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
     त्या नंतर गावातील एकजुटीचे  त्याचंच फळ म्हणजेच  ह्या वर्षी गावाच्या प्रवेश सीमेवर स्वागत करण्याचे ग्राम विकास मंडळ ताम्हणमळा यांच्या वतीने गाव सीमेवर " ताम्हणमळा गाव प्रवेश द्वार " उभारण्यात आले. ह्या प्रवेश द्वाराचे उदघाटन  विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले.
      या दोन्ही उपक्रमास सरपंच सौ पुनम घाणेकर, उपसरपंच अनंत घाडे, ग्रामसेवक  सुनिल राठोड, पोलीस पाटील अमर गोखले, ग्रामपंचायत सदस्य सुनिल कदम, अजित पानवलकर, प्रतिभा तटकरे, सरीता घाडे, दिपाली गुरव,श्रीमती. विभावरी देवधर, तंटामुक्ती अध्यक्ष किशोर पवार, मुख्यध्यापक चंद्रकांत बाधावटे सर आणि शिक्षकवृंद, मुंबई - पुणे मंडळाच्या वतीने अध्यक्ष- उदय कदम, सचिव- रणजित वरवटकर, खजिनदार - संकेत आगरे, सह खजिनदार-  विजय शिगवण, सूर्यकांत गुरव, शुभम कदम, गजानन तांबडे, विजय घोरपडे,  हर्षल खरात, वैभव खरात उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सह सचिव धीरज मोहिते यांनी केले. सर्व ग्रामस्थांचे आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार व्यक्त करत सांगता झाली.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...