Saturday, 17 August 2024

शिवसेना शहरप्रमुख मा. नगरसेवक रवी पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिम येथील मेट्रोचा मार्ग बदलला !!

शिवसेना शहरप्रमुख मा. नगरसेवक रवी पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिम येथील मेट्रोचा मार्ग बदलला !!

** आता कल्याण पश्चिम येथील मेट्रोचा मार्ग आता दुर्गाडी - खडकपाडा - बिर्ला कॉलेज असा 

कल्याण, प्रतिनिधी : २०१६ साली राज्य सरकारने मेट्रो ५ ची घोषणा केली ठाणे - भिवंडी- कल्याण या मार्गाने ती प्रस्तावित होती, मात्र या मार्गामुळे कल्याण शहराच्या ज्या भगाचा विकास झपाट्याने होतो आहे आणि जिथे मुख्य लोकवस्ती आहे अशा नागरिकांना मेट्रोचा लाभ घेता येणार नव्हता. या मार्गात बदल करण्यासाठी जेव्हा प्रकल्पाची घोषणा करण्यात आली व मार्ग अधोरेखित केले तेंव्हा पासून (२०१६ ऑक्टोबर) मा. नगरसेवक रवी पाटील हे सातत्याने प्रयत्न करीत होते. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या लक्षात आणून दिली.  वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून मेट्रो ५ चा मार्ग बदलून दुर्गाडी - खडकपाडा- बिर्ला कॉलेज या मार्गाने ती मार्गस्थ होईल, याचा  समस्त कल्याणकरांना आनंद झाला आहे.

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...