Friday 16 August 2024

कल्याण डोंबिवली शहराच्या विकासासाठी कटिबद्ध - मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण डोंबिवली शहराच्या विकासासाठी कटिबद्ध - मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 


मुंबई, सचिन बुटाला : मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे आज बैठक पार पडली. खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यामातून कल्याण-डोंबिवली शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.


या बैठकीला परिवहन कामगार कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ हाउसिंग इंडस्ट्री, कल्याण-डोंबिवली युनिट यांचे प्रतिनिधीत्व केले.


शहरी विकास योजना तयार करणे आणि त्यावर मार्गदर्शक तत्वे तयार करून अंमलबजावणी करणे या योजनेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका व ठाणे महानगरपालिका या एकाच कॅटेगिरी मध्ये येतात, त्यामुळे शहर विकास योजनेतील तरतुदी ठाणे प्रमाणेच  कल्याण डोंबिवली शहराला देखील लागू करण्यात यावी अशी मागणी एम सी एच आय ने केली, असे केल्यामुळे विकासा कामांना येणारे अडथळे दूर होणार आहेत! यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.


या बरोबरच कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेत २००५ पूर्वी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी या दोन्ही विषयावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय.एस. चहल, विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, वित्त विभागाच्या सचिव शैला ए, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड उपस्थित होते.

तसेच एमसीएचआयचे अध्यक्ष राजेश गुप्ता, सचिव दिनेश मेहता, रवी पाटील, भरत छेडा, विकास वीरकर, जोहर झोजवाला, मिलिंद चव्हाण, रामचंद्र वारक, अनिल भतीजा, जयेश तिवारी, अमित सोनावणे, संजय पाटील, अमित होतचंदानी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवली या शहरात वेगाने विकास होत आहे. हे लक्षात घेऊन येथील नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे शहराप्रमाणे सर्व योजना राबविण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले. तसेच भविष्यात कल्याण-डोंबिवली परिसराला लागणारी पाण्याची गरज भागू शकेल याकरिता महानगरपालिका, जलसंपदा विभाग यासह इतर यंत्रणांनी समन्वयाने मार्ग काढावा, असे ही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

बोंड्ये गावच्या माजी सरपंच ललिता गुडेकर यांना मातृशोक; मातोश्री वासंती गुडेकर यांचे निधन !!

बोंड्ये गावच्या माजी सरपंच ललिता गुडेकर यांना मातृशोक; मातोश्री वासंती गुडेकर यांचे निधन !! मुंबई (उत्कर्ष एस. गुडेकर) :        ...