Sunday 11 August 2024

विधानसभा व कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी सज्ज !!!

विधानसभा व  कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी सज्ज !!!

डोंबिवली, प्रतिनिधी : दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवलीतील प्रमुख पदाधीकारी तसेच राज्य समितीतील पदाधिकाऱ्यांची बैठक डोंबिवली आप (पश्चिम) महिला अध्य्क्षा सौ रेखा रेडकर यांच्या कार्यालयात पार पडली .

सदर बैठकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुका आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने लादणार असल्याची घोषणा करण्यात आली.  
डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असून सुद्धा कल्याण डोंबिवली शहरात अजून मूलभूत सुख सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहेत, इतके  वर्ष भाजपची सत्ता असून सुद्धा शहरातील रस्त्यांवर खड्डे तसेच आहेत, अशी टीका आप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी केली. तसेच महाराष्ट्र सरकार दिल्लीच्या आप सरकारची कॉपी करून लाडकी बहीण सारखे योजना महाराष्ट्र राज्यात घोषणा करत आहेत असे हि शिंदे यांनी राज्य सरकार वर टीका केली .

लवकरच कल्याण डोंबिवली संहारासाठी आम आदमी पार्टी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार अशी माहिती कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी दिली .

कल्याण डोंबिवली शहर सुशिक्षित नागरी म्हणून ओळखले जाते तरी येत्या निवडणुकीत आप पक्ष शहरातील सुशिक्षित तसेच तरुण वर्गाला निवडणुकीत संधी देणार असल्याचे आप पश्चिम महिला अध्यक्ष सौ रेखा रेडकर यांनी सांगितले .

सदर बैठकीत आप प्रदेश उपाधयक्ष धनंजय शिंदे, कल्याण जिल्हा अध्यक्ष धनंजय जोगदंड, डोंबिवली पश्चिम महिला अध्यक्षा रेखा रेडकर, युथ विंगचे राहुल दत्ता, रिक्षा यूनीयन अध्यक्षा प्रियांका पाटील, डोंबिवली पूर्व उपाध्यक्ष अवधूत  दीक्षित व इतर कार्यकर्ते उपस्थित होते . 


धनंजय जोगदंड 
९३२३२११३४०

रेखा रेडकर 
८८९८८८८७८

No comments:

Post a Comment

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !!

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !! ** प्रशांत यादव यांची शरद पवार गट तर्फे विधानसभासाठी अधि...