Saturday, 5 October 2024

मुख्यमंत्री लाडकी बहीण संपर्क अभियानाचा कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात उत्साहात शुभारंभ !

मुख्यमंत्री लाडकी बहीण संपर्क अभियानाचा कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात उत्साहात शुभारंभ !

कल्याण, सचिन बुटाला :
केवळ महाराष्ट्र राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात गौरवली गेलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या सर्वाधिक लोकप्रिय योजनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहीण संपर्क अभियानाचा आजपासून कल्याण पश्चिमेत दणक्यात शुभारंभ करण्यात आला. स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेतील उंबर्डे - कोळीवाली विभागीय शाखेच्या माध्यमातून प्रभाग क्र १ व २ मध्ये झालेल्या या संपर्क अभियानाला शेकडो लाभार्थी महिलांनी उपस्थिती लावली होती.

या महिलांशी संवाद साधताना आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू ठेवायची असेल तर मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे साहेब यांनाच निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच पुन्हा एकदा निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात दुप्पट वाढ केली जाईल, असा विश्वासही आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरील गाण्यावर उपस्थित महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरत आपला आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले.

यावेळी शिवसेना उपनेत्या सौ.विजयाताई पोटे, शहरप्रमुख रवी पाटील साहेब, महिला जिल्हा संघटक सौ.छायाताई वाघमारे, शहर संघटक सौ.नेत्राताई उगले, विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर, उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, सुनील खारुक, विजय देशेकर, मोहन उगले, मा.नगरसेवक जयवंत भोईर, मा. नगरसेविका सौ.वैशालीताई भोईर, विभाग प्रमुख रामदास कारभारी, शाखा प्रमुख रोहन कोट, रुपेश खारुक, डॉ.धीरज पाटील, सौ.रचनाताई गायकवाड, सौ.रजनीताई भोईर, सौ.सुरेखा दिघे, सौ.सुप्रिया भोईर तसेच शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी महिला उपस्थित होते...

No comments:

Post a Comment

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव !

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव ! मुंबई (शांताराम गुडेकर)          ...