Saturday 5 October 2024

माता रमाबाई आंबेडकर उद्यानातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या विरंगुळा केंद्राचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन !!

माता रमाबाई आंबेडकर उद्यानातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या विरंगुळा केंद्राचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन !!

कल्याण, सचिन बुटाला :
कल्याण पश्चिमेतील माता रमाबाई आंबेडकर उद्यान हे येथील महत्त्वाच्या उद्यानांपैकी एक उद्यान. याठिकाणी दररोज मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. या ज्येष्ठ नागरिकांसाठी आता या उद्यानात एक विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार आहे. कल्याण पश्चिमचे कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या हस्ते या केंद्राचे भूमीपूजन करण्यात आले.

माता रमाबाई उद्यानात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधण्याची मागणी आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी मोहन उगले यांनी केली होती. त्याला आमदार साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. ज्यातून या ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राची उभारणी होणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपशहर प्रमुख / मा.नगरसेवक मोहन उगले, महिला शहर संघटक नेत्राताई उगले, विभागप्रमुख अनंता पगार, अजय सावंत, परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मंडळांचे पदाधिकारी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

'विश्वात हिंदी भाषे'चे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे - रानी अनिक चंद्र मिश्रा

'विश्वात हिंदी भाषे'चे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे - रानी अनिक चंद्र मिश्रा ** संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात हिंदी सप्ताह...