Saturday 5 October 2024

अनधिकृत कामांना आळा न घालता पैसे खाऊन कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच आधी निलंबित करा - डॉ. राजन माकणीकर

अनधिकृत कामांना आळा न घालता पैसे खाऊन कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच आधी निलंबित करा - डॉ. राजन माकणीकर 

(पासपोली गाव अनाधिकृत कथारसिस फिल्म स्टुडिओ प्रकरण)

मुंबई दि (प्रतिनिधी) : पासपोली गाव पवई येथील निसर्गरम्य परिसरात कथारसिस नावाचे अनधिकृत स्टुडिओ असून या स्टुडिओबाबत असंख्य तक्रारी देऊनही अद्यापही कसली कारवाई झाली नाही. यामुळे पैसे खाऊन अनधिकृत बांधकामांना कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

पासपोली गाव विहार लेक शेजारी कथारसिस नावाचे अनधिकृत स्टुडिओ उभारले असून अशोक राय जो अनधिकृत हॉटेल टुरिस्ट चा मालक आहे त्याचाच असून हॉटेल टुरिस्ट प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. या स्टुडिओतून लाखो रुपयांची कमाई येथे मालकाला होते, हा स्टुडिओ सध्या भाज्ञा एकाला दिलेला आहे. सदरचा स्टुडिओ हा पूर्णपणे अनधिकृत आहे, स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने तसेच आर्थिक जोराच्या बळावर हप्ते देऊन चालवला जात आहे, एस. वॉर्ड पालिका प्रशासनाला या बाबत लेखी तक्रार करूनही प्रशासन जाणीवपूर्वस्क मूग गिळून बसले आहे.

शासनाने पालिका प्रशासनात अनधिकृत बांधकाम्माना आळा घालण्यासाठी एक स्वतंत्र विभाग स्वतंत्रपणे निर्माण केला आहे  व करोडो रु पगार या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला जातो. ही मंडळी फक्त रोड वरील गोर गरिबांची खाद्य पदार्थांच्या गाड्या उठविण्यास मात्तब्बर झाली आहेत. या अधिकाऱ्यांच्यात हिम्मतच नाही अश्या मोठ्या बांधकामावर हातोडा टाकायचा. फुकटचे खाऊन यांना माज चढला आहे. माजलेले अधिकारी प्रशासनात धोकादायक असल्याचेही डॉ. माकणीकर म्हणाले.

लाखो रु हप्ता घेऊन स्थानिक पालिका प्रशासनसह पोलीस प्रशासन सुद्धा गप्प आहे. या सर्व अनधिकृत बांधकामाना स्थानिक नगरसेवक व स्वयंघोषित नेता ठरलेली भ्रष्ट पिलावळ संरक्षण देत आहे. 

येथील अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी पालिका प्रशासनाला दिल्या नंतर पालीकेतून भ्रष्ट अधिकारी जे शरमिंदे झालेले आहेत ही लोक अनधिकृत बांधकाम दाराशी कॉल वर माहिती देतात व्हाट्सअप वर तक्रारीची प्रत पाठवतात.. त्यानंतर अनधिकृत बांधकाम धारक नगरसेवकाचा पाळीव कार्यकर्ता स्वयंघोषित नेता म्हणवून घेणाऱ्या बेईमान पिलावळी कडे जातात. त्यावेळी ती पिलावळ वळवळ करते आणि आर्थिक जोराबर संबंधित विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाकिटे देऊ प्रकरण शांत करते.

नगरसेवकाचा पाळीव, स्वयंघोषित नेता कोण? याचा शोध लावावा. हा शोध लावण्यासाठी अनधिकृत बांधकाम असलेला कथारसिस स्टुडिओ निष्काशीत करून बांधकामधारकाला अटक करून विचारपूस  केल्यास हा पांढरपेशा पाळीव प्राणी समोर येईल. 

एकंदरीत पालिका प्रशासनातील अधिकारी अनधिकृत बांधकामधारकांचे हप्ते खाऊन निगरगठ्ठ झाले असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची वंशावळ संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी डॉ. माकणीकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

'विश्वात हिंदी भाषे'चे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे - रानी अनिक चंद्र मिश्रा

'विश्वात हिंदी भाषे'चे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे - रानी अनिक चंद्र मिश्रा ** संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात हिंदी सप्ताह...