Friday 4 October 2024

नवरात्रोत्सवात १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक परवानगीसाठी दिवस वाढवुन देण्याबाबत स्वराज अभियानची मागणी...

नवरात्रोत्सवात १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक परवानगीसाठी दिवस वाढवुन देण्याबाबत स्वराज अभियानची मागणी...

वसई, प्रतिनिधी :- हिंदु धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण म्हणजे नवरात्र उत्सव सध्या सगळीकडे गरब्याची धुम सुरू आहे. दरदिवशी विविध मंडळानी आयोजित केलेल्या गरब्याला गरबा रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
वसई तालुक्यात ठिकठिकाणी नवरात्रौत्सवात गरबा-दांडियाचे आयोजन केले आहे. सर्व जाती धर्माचे नागरिक कायद्याचे पालन करत नवरात्रौत्सव उत्साहात साजरा करतात. 
नवरात्रीसाठी आवाजाचे नियम शिथिल करत मंडळांना उत्सवाच्या शेवटच्या दोन दिवस  मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी वसई तालुक्यात इतर दिवशी रात्री १० वाजेनंतर वाद्य वाजविण्यावर बंदी आहे. त्यामुळे सण -उत्सवाहांवरही विरजन पडत असल्याची भावना गरबा प्रेमींकडुन होत आहे.

सर्व देवी भक्तांच्या व गरबा रसिकांच्या  भावना लक्षात घेता ध्वनीक्षेपक, वाद्य रात्री १२ वाजेपर्यंत वाजवण्यास परवानगी  आदेश संबंधितांना देण्याबाबत स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  रूचिता नाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे

No comments:

Post a Comment

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ !

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ ! कल्याण, सचिन बुटाला : ...