शंभुजती गुरू गोरक्षनाथ प्रकट दिन
गोरक्षनाथ ११ व्या ते १२ व्या शतका दरम्यान झालेले नाथ योगी होते. गोरक्षनाथांचे मंदीर गोरखपूर उत्तरप्रदेशामध्ये आहे. गोरक्षनाथांचे नावावरून नेपाळमधील गोरखा या नावाचा उगम आहे. गोरख जिल्ह्यात एका गुहेत गोरक्षनाथांचे एका पायाचे पद चिन्ह आहे.येथे वैशाख पौर्णिमा एक उत्सव होतो.
मच्छिंद्रनाथ भारतभर भ्रमण करीत असे फिरत असता एका घरी भिक्षा मागण्यास गेले. त्या स्त्रीस संतती नव्हती. दारी आलेल्या तेज:पूंज साधूला भिक्षा वाढताना पुत्रप्राप्तीची कामना व्यक्त केली. मच्छिंद्रनाथांने त्या स्त्रीला चिमूटभर भस्म दिले व आशिर्वाद दिला. मुलगा होईल सदर स्त्रीने आपल्या शेजारणीला झालेली हकीकत सांगितली पण त्या हसू लागल्याने त्या स्त्रीने ते भस्म शेणाच्या ढिगावर टाकून दिले. बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत आले व मुलाची चौकशी केली तेव्हा मूल झालेच नाही असे त्या स्त्रीने सांगितले. सर्व हकिकत स्त्रीकडून ऐकून मच्छिंद्रनाथ शेणाच्या ढिगाऱ्याजवळ जाऊन चलो गोरक्ष म्हणून हाक मारली. त्या शेणातून मुलगा प्र्गटला व म्हणाला ‘आदेश’ मग मच्छिंद्रनाथ त्याला घेऊन गेले. तेच गोरक्षनाथ. गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त नेपाळ व भारतातच नाही तर अरब जगतावरही आहे. कानाला भोके पाडण्याची पद्धत गोरक्षनाथांनीच सुरू केली. अशी भोके पाडण्याआधी साधकांना अतिशय कठोर हटयोगाची साधना करावी लागे. ते साधू अवधूत असत. गोरक्षनाथांनी ९ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केला. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शीळा होय. ॠषींना घेऊन गुरु गोरक्षनाथ कौलगिरीकडे गेले तेथे त्यांना एका शिळेवर सर्व ऋषींना बसवून उपदेश दिला त्यातील ९ शिष्यांनी तो जसाचे तसा ग्रहण केला त्यांना नवनाथ म्हणतात. ते नवनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ व चरपटीनाथ. त्या शिळेला अनुपम शिळा म्हणतात.आदि गुरू दत्तात्रेय आणि गोरक्षनाथ यांचा संबंध पाहिला आहेच. भगवान दत्तात्रेय आणि सिद्धाचार्य गोरक्षनाथ यांची भेट गिरनार पर्वतावर झाली असल्याचे प्रसिध्द आहे. याच ठिकाणी गोरक्षनाथांवर दत्तात्रेयांनी सिद्धीसामर्थ्य दाखवून अनुग्रह केला. आज या स्थानाला "कमंडलू तीर्थ’ या नावाने महत्त्व प्राप्त झाले आहे. गोरक्षनाथांनी येथील शिखरावरील दत्तपादुकांचे दर्शन घेतल्याची कथा प्रसिद्ध आहे. दत्तांनी त्यांना या ठिकाणी उन्मत पिशाचवत् अशा दिगंबर, भस्मचर्चित, जटाजूटधारी अशा स्वरूपात दर्शन दिले. नाना सिद्धींचे चमत्कार दाखवून गोरक्षनाथांवर दत्तात्रेयांनी याच ठिकाणी कृपा केली. गोरक्षनाथांच्या परंपरेतील सर्व नाथांचा दत्तात्रेयांशी संबंध असल्याने व दत्तपंथातील अनेक महत्त्वाच्या बाबी नाथपंथाने विकसित केल्या असल्याने श्रीगोरक्षनाथांच्या चरित्राची रूपरेखा पाहणे अगत्याचे आहे. नाथसिद्धांच्या ज्या विविध नामावली सध्या उपलब्ध आहेत त्यांत गोरक्षनाथांचा उल्लेख येतो.मत्स्येंद्रनाथांचे शिष्य म्हणून गोरक्षनाथांचा उल्लेख येतो.
सर्व नाथभक्त गुरू गोरक्षनाथ यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात.
- नाथभक्त केतन दत्ताराम भोज
- भ्रमणध्वनी - ८३६९५५४४१८
No comments:
Post a Comment