Wednesday, 13 November 2024

महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय म्हणजे काळया दगडावरची भगवी रेघ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय म्हणजे काळया दगडावरची भगवी रेघ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

कल्याण, प्रतिनिधी :सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहता महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय म्हणजे काळया दगडावरची भगवी रेघ असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोईर यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणात आले होते. येथील स्व. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे झालेल्या महाविजय संकल्प सभेमध्ये ते बोलत होते. या सभेचे वैशिष्ट्य ठरले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी लाडक्या बहिणींनी केलेली प्रचंड गर्दी. ही सभा झालेले क्रीडांगण या लाडक्या बहिणींनी अक्षरशः फुलून गेले होते. 

तर आपल्याला अजिबात हलक्यात घेऊ नका, शिवसेना प्रमुखांचे विचार आणि धनुष्यबाण ज्यांनी काँग्रेसच्या दावणीला बांधले, ते महाविकास आघाडीचे सरकार आपण उलथवून टाकले. जर का असे केले नसते तर कल्याण पश्चिमसह संपूर्ण महाराष्ट्रात विकासकामांची गंगा आज निर्माण झाली नसती. तर येत्या काळात कल्याण पश्चिमेतील मेट्रोचे कामही लवकर सुरू होईल अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणकर नागरिकांना आश्वस्त केले. 

मुख्यमंत्र्यांकडून डायलॉगच्या माध्यमातून विश्वनाथ भोईर यांचे कौतुक...

या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटातील जली को आग कहते है, बुझी को राख कहते हैं, और जिस राख से बारुद बनता हैं उसे विश्वनाथ कहते हैं अशा सुप्रसिद्ध डायलॉगच्या माध्यमातून महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचे कौतुक केले. तसेच या सभेला झालेली तुफान गर्दी पाहता विश्वनाथ भोईर यांचा विजय म्हणजे काळया दगडावरची भगवी रेघ असल्याचे सांगतानाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गाफील न राहण्याचेही आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

या सभेला भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी मंत्री कपिल पाटील, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ (आप्पा) शिंदे, माजी आमदार नरेंद्र पवार, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, शिवसेना उपनेत्या विजया पोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, शिवसेनेचे शहराध्यक्ष रवी पाटील, संजय पाटील, महिला संघटक छायाताई वाघमारे, विधानसभा संघटक मयूर पाटील, माजी महापौर वैजयंती घोलप, माजी नगरसेवक प्रभूनाथ भोईर, श्रेयस समेळ, विद्याधर भोईर, गणेश जाधव, वैशालीताई भोईर, सुनील खारूक, रामदास कारभारी, युवासेनेचे सुचेत डामरे, प्रतीक पेणकर यांच्यासह महायुतीच्या मित्रपक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

घाटकोपर पश्चिम मध्ये गणेश चुक्कल यांच्या प्रचाराचा झंझावात !!

घाटकोपर पश्चिम मध्ये गणेश चुक्कल यांच्या प्रचाराचा झंझावात !! ** प्रचार सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद घाटकोपर, (केतन भोज) : ...