काशिनाथ गोरुले, सोमा फडकले, संतोष गुरव, दिनेश साबळे यांना नमन लोककला संस्थेचा "लोककला गौरव पुरस्कार" तर नमनकार सखाराम नेवरेकर यांना "लोककला प्रेरणा पुरस्कार, श्री पाणबुडी देवी कला मंचला "लोककला विशेष गौरव" पुरस्कार - २०२५" जाहीर !
** नमन लोककला संस्था ( रजि.) आयोजित "जागर नमन लोककलेचा - सन्मान लोक कलावंतांचा" कार्यक्रमात चिपळूण येथे होणार पुरस्काराचे वितरण
मुंबई (शांताराम गुडेकर/दिपक कारकर) :
नुकतेेच नमन लोककला संस्थेचे २०२४-२५ चे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये गाव निगुडवाडी, ता.संगमेश्वर येथील प्रसिद्ध ढोलकीपटू श्री.काशिनाथ लक्ष्मण गोरुले यांना "लोककला गौरव पुरस्कार" जाहीर करण्यात आला आहे.
याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील श्री.सोमा फडकले यांनाही "लोककला गौरव पुरस्कार" तसेच ओझरे-देवरुख येथील श्री.संतोष गणपत गुरव व मुरादपुर-देवरुख येथील श्री.दिनेश साबळे यांना "लोककला प्रेरणा पुरस्कार" जाहीर करण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील या चार जणांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील नमन कलावंतांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडीचे सुपुत्र नमनकार सखाराम लक्ष्मण नेवरेकर यांना "लोककला प्रेरणा पुरस्कार - २०२५" जाहीर झाल्यामुळे कातळवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा झळकला आहे. याशिवाय मुंबईसह ठाणे, पूर्व -पश्चिम उपनगरमध्ये अनेक नाट्यगृहमध्ये कोकणातील लोककला नमन, शक्ती -तुरा प्रयोग हाऊस फुल्ल करणारे श्री पाणबुडी देवी कला मंचला लोककला विशेष गौरव पुरस्कार - २०२५" जाहीर झाला आहे.
लोककला गौरव पुरस्कार १० जण, लोककला प्रेरणा पुरस्कार १२ जण, तर लोककला विशेष पुरस्कार ३ दिले जाणार आहेत. चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे रविवार दि.५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वा. हे पुरस्कार मान्यवरांकडून दिले जातील. कार्यक्रमास सर्वश्री ऊदय सामंत- (ऊद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य,) आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, विनय नातू, रमेश कदम, सदानंद चव्हाण, प्रशांत यादव, प्रमोद गांधी, चंद्रकांत भोजने, दिनेश कुरतडकर, ॠषिनाथ पत्याने, शरद बोबले, अभय सहस्त्रुद्धे, दत्ताराम आयरे, प्रसिद्ध अभिनेता ओंकार भोजने इत्यादी मान्यवर उपस्थित असणार आहेत. यावेळी करमणुकीचा कार्यक्रम- केदारलिंग नाट्य नमन मंडळ, काटवली, देवरुख यांचे "नमनचे सादरीकरण होणार आहे. या सोहळ्यासाठी नमन कलाकार, रसिक, नागरिक, मित्रपरिवार सर्वांनी ऊपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री.रवींद्र मटकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment