उत्कर्ष महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन संपन्न !
विरार, पंकज चव्हाण : विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच गुरुवार दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी बारावी नंतर विवा महाविद्यालयात असणारे करिअर चे पर्याय ह्या विषयावर सेमिनार घेण्यात आला. ह्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विवा लॉ कॉलेजचे प्राचार्य ठाकूर जेठानी, विवा कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य वैभव पाटील, बँकिंग आणि इन्शुरन्स विषय विभागप्रमुख डॉ. रोशनी नागर, विवा पदवी महाविद्यालयाच्या प्रा. सॅन्ड्रा आल्मेडा, डेटा सायन्स च्या विषय विभाग प्रमुख प्रा. श्वेता यंदे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. ह्या सेमिनार साठी उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. मुग्धा लेले, उपप्राचार्य श्री. रमेश पाटील, उपप्राचार्या सौ. हेमा पाटील ह्यांनी करिअर सेमिनार ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
ह्या कार्यक्रमाला कल्पना राऊत मॅडम ह्यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. ह्या करिअर सेमिनार चा लाभ उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी घेतला. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. ओल्गा डिमेलो ह्यांनी केले. आणि ह्यासाठी प्रा. योगेश चौधरी आणि प्रा. श्रद्धा पाटील ह्यांनी विशेष सहकार्य केले.
No comments:
Post a Comment