Saturday, 5 April 2025

कल्याण -माळशेज आळेफाटा राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे !!

कल्याण -माळशेज आळेफाटा राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे !!

**आम्ही नगरकर संघटनेचा रास्ता रोको चा इशारा

NH 61 राष्ट्रीय महामार्ग आहे का नागरिकांचा प्रश्न ?

कल्याण, प्रतिनिधी - कल्याण माळशेज मार्ग आळेफाटा राष्ट्रीय रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून याबाबत प्रशासन व बांधकाम विभाग कधी लक्ष देईल असा प्रश्न नियमित भाजीपाला वाहतूक करणारे वाहनचालक,प्रवासी यांना पडला आहे.माळशेज पर्यटनाच्या फक्त चर्चाच होतात, वास्तविक पायभुत सुविधांच काय ?
NH 61 राष्ट्रीय महामार्ग असलेला हा रस्ता हा खरच राष्ट्रीय महामार्ग आहे का असा प्रश्न पडतो, पावसाळ्यात तर रस्त्याची परिस्थिती अधिकच खराब असते सध्या उन्हाळ्याची सुट्टी लागत आहे अनेक नागरिक हे आपल्या कुटुंबासह गावाला जात असतात परंतु रस्त्याची अवस्था बघितल्यावर एक प्रकारची चिड येते आहे.

भाजीपाला वाहनचालक व नागरीकांच्या तक्रार नुसार आम्ही नगरकर मुंबई संघ व स्फूर्ती फाउंडेशन वतीने संबंधित विभागाला हा रस्ता दुरूस्ती साठी लवकरच निवेदन देणार आहे, तसेच सदर रस्ता १५ दिवसांत व्यवस्थित व चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरून दूरूस्ती न झाल्यास झाल्यास रास्ता रोको आंदोलन व नागरीकांच्या वर्गणीतून रेती,वाळू,डांबर खरेदी करून संबंधित रस्ते विभागाला रस्ता दूरूस्ती साठी देण्यात येईल  अशी माहिती स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष व आम्ही नगरकर कार्याध्यक्ष बजरंग शांताराम तांगडकर, अध्यक्ष मंगेश शेळके, संचालक शांताराम झावरे, तानाजी करपे, हिरा आवारी, प्रशांत आहेर, रामनाथ भोजने यांनी दिली.

No comments:

Post a Comment

कल्याण मध्ये रंगला नगरकर प्रिमियर क्रिकेट लिग स्पर्धचा थरार !

कल्याण मध्ये रंगला नगरकर  प्रिमियर  क्रिकेट लिग स्पर्धचा  थरार ! कल्याण, प्रतिनिधी - कल्याण मध्ये आम्ही नगरकर प्रतिष्ठान आयोजित ...