भव्य 'रक्तदान शिबिरां'द्वारे महात्मा फुलें व बाबासाहेबांना अभिवादन !!
महात्मा ज्योतिबा फूले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने प्रथमच पिपल्स एज्यूकेशन सोसायटीच्या मुंबईतील ३ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांनी संयुक्तिक 'भव्य रक्तदान शिबीराचे' आयोजन शुक्रवार, दि. ११/४/२०२५ रोजी तीन वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर (दादर, चर्चगेट व सिएसएमटी) केले होते.
तिन्ही शिबिरातून १५०+ युनिट्स रक्त जमा झाले. यामध्ये दादर रेल्वे स्थानकातील आंबेडकर कॉलेजच्या शिबीरातून सर्वात जास्त (७५) रक्त युनिट्स जमा झाले. फोर्ट येथिल दोन्ही सिद्धार्थ महाविद्यालयाच्या सिएसटी व चर्चगेट रेल्वे स्थानकातील शिबिरातून एकून ८० रक्त युनिट्स जमा झाले.
तिनही ठिकाणी ७० पेक्षा जास्त रक्तदात्यांची इच्छा असूनदेखील त्यांचे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे ते रक्तदान करू शकले नाहीत.
अत्यंत कडक उन्हाळ्याच्या गरम वातावरणात व परिक्षा चालू असताना देखिल तिन्ही महाविद्यालयाच्या एन एस एस कार्यक्रम अधिकार्यांच्या नेतृत्वात, जवळजवळ ५० विद्यार्थ्यांनी प्रवाशी रक्तदाते मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या शिबिराला काही माजी विद्यार्थी व शिक्षकांनी देखील भेट देऊन रक्तदानही केले व विद्यार्थ्यांचे कौतूक केले. सर्व शिबिरांसाठी लायन्स क्लब मुंबई महानगर यांनी सर्वांचे नास्ता पाणी व जेवणासह पेंडालचा खर्च करून उत्तम सहकार्य केले.
या शिबिराच्या योग्य नियोजनासाठी शिबीर समन्वयक श्री. अनिल गरेंच्या नेतृत्वात तीनही कॉलेजचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन खडतर, डॉ. धनंजय चंदनशिवे, प्रा. विशाल करंजवकर व डॉ. विष्णू भंडारे यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच नायर रक्तपेढीचे समाज विकास अधिकारी कांतीलाल पवार, सायन रक्तपेढीचे शुभम भोईर व जगजीवनराम रेल्वे रक्तपेढीचे प्रथमेश सकपाळ यांनीही उत्तम सहकार्य केले. मुंबई विद्यापिठ, रासेयोचे संचालक प्रा. सुशिल शिंदे व जिल्हा समन्वयक, प्रा. क्रांती उके यांनीदेखिल आमच्या या संयुक्त रक्तदान मोहीम उपक्रमाला पाठींबा देऊन सर्वांचे कौतूक केले.
*-डॉ. विष्णू भंडारे, मुंबई प्रतिनिधी*
No comments:
Post a Comment