नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !
*शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाची कारवाई ची मागणी*
नालासोपारा, प्रतिनिधी :- नामांकीत लॉरेल कंपनीच्या औषधे व वस्तुवर असलेले लेबल बदलवुन त्याची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नालासोपारा येथिल वि केअर मेडिकल येथुन व्यक्तीने लॉरेल कंपनीच्या वस्तुचे खरेदी केली असता बाहेरील बॉक्स वर मुदत २०२७ व आतील वस्तुंवर मुदत तारीख २०२४ असल्याचा प्रकार समोर आला याबाबत त्वरीत औषध विक्रेता ला प्रकार सांगताच त्यांनी लॉरेल कंपनीचे चुक असल्याचे सांगितले.
संबधित व्यक्तीने शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार करताच शिवसेना उपनेते व अध्यक्ष अँड अरून जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख रूचिता नाईक यांनी अन्न व औषध प्रशासनाची भेट घेत नागरीकांच्या जीवाशी खे॓ळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला.
तक्रारीची दखल घेत अन्न सुरक्षा मानक कायद्याची पायमल्ली केल्याचे आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाकडुन उत्पादने सील करून अधिक तपास सुरू केला. मुदत संपलेल्या औषधांची विक्री करणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे, म्हणून यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
या लॉरेल कंपनीवर फौजदारी गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तर्फे जिल्हाप्रमुख रूचिता नाईक यांनी केली....
No comments:
Post a Comment