सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले जवान नंदन रघुनाथ जाधव यांचा चांबळे ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता सन्मान...
वाडा, प्रतिनिधी : वाडा तालुक्यातील चांबळे येथील सैन्यदलातील जवान नंदन रघुनाथ जाधव हे भारतीय सैन्य दलात 20 वर्षे सेवानिवृत्त झाले असून त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळा करण्यात आला.
नंदन जाधव हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून ते जून 2005 साली सेवेत रुजू झाले होते. जून 2006 पर्यंत हैद्राबाद ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पठाणकोट (पंजाब) येथे देण्यात आली होती. तर 2007 ते 2015 पर्यंत त्यांची सलग 8 वर्षे जम्मु काश्मीर येथे पोस्टिंग होती. त्यानंतर 2015 ते 2022 पर्यंत संभाजी नगर (औरंगाबाद) येथे पोस्टिंग होती. तर 2022 ते 2025 पर्यंत त्यांची चीन सीमेवर दुर्गम ठिकाणी त्यांनी काम केले. अशाप्रकारे भारतीय सैन्यदलातील गौरवास्पद व निष्कलंक सेवा बजावून ते 31 मार्च 2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
नंदन जाधव यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा हनुमान जयंतीच्या दिवशी (12 एप्रिल) रोजी आयोजित करण्यात आला होता. सैन्यदलातील सेवेबद्दल ग्रामस्थांच्यावतीने नंदन जाधव यांना कृतज्ञता सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष जयेश शेलार, गोऱ्हे उपसरपंच व तेली समाज युवक अध्यक्ष अनिल खिलारे, मिठाराम बोंद्रे सर, ग्रामस्थ धनेश पाटील, रमेश पाटील, xxx यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास कासार सर यांनी केले.
सैन्य दलात सेवा करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, जास्तीजास्त तरुणांनी सैन्य दलात जाऊन देशाची सेवा करावी.
नंदन रघुनाथ जाधव
(सेवानिवृत्त जवान)
सौजन्य -
श्री. जयेश शेलार
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष, वाडा
No comments:
Post a Comment