Sunday, 27 April 2025

शिक्षण स्वाभिमानी संघटना आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम...

शिक्षण स्वाभिमानी संघटना आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम...

मुरबाड- (योगेश्वरी मणी) 
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 'शिक्षण स्वाभिमानी संस्था' आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचे वतीने इन्व्हर्टर भेट देण्यात आला. शिक्षण स्वाभिमानी संघटना खेड्यापाड्यातील अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहचुन त्यांच्या अडीअडचणी समजून घेते.विद्यार्थ्यांच्या गरजा व त्याची परिपुर्ती करण्याची जबाबदारीही आपल्या कुवतीनुसार घेत असते. मुरबाड तालुक्यातील एकलहरे गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा येथे अधुनमधून विद्युतपुरवठा खंडीत होत असतो. त्यामुळे शिक्षकांना अडचण होवुन विद्यार्थ्यांची ही गैरसोय होते.ही बातमी शिक्षण स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय गायकवाड यांना समजताच शाळेसाठी एक इन्व्हर्टर ची सोय करून द्यावी हा निश्चय त्यांनी केला.श्रमिक (मु.) पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष आणि जेष्ठ समाजसेवक महेंद्र उर्फ अण्णासाहेब पंडित यांचेशी संजय गायकवाड यांनी चर्चा करून आज रोजी एकलहरे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष म्हाडसे, शिक्षण कमिटी अध्यक्ष सुनील निचीते तसेच कमिटी सदस्या, चंदनाताई निचीते, सौ.रहीमा शेख, वैशाली निचीते, निशा निचीते आयोजीत छोटेखानी कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी शिक्षण स्वाभिमानी संघटना व श्रमिक (मु.) पत्रकार संघाच्या माध्यमातून शाळेसाठी मान्यवरांच्या हस्ते इन्व्हर्टर भेट करण्यात आला. 

सदर कार्यक्रमास जेष्ठ समाजसेवक *मा.अण्णासाहेब पंडित, मा.संजय गायकवाड* यांचेसह ठाणे जिल्ह्यातील युवा उद्योजक आणि अखिल भारतीय मातंग सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष, *मा.रवी गवळी,* लहुजी शक्ती सेना युवा ठाणे जिल्हाध्यक्ष, *मा.श्रावण बनसोडे.* अखिल भारतीय मातंग सेना कल्याण शहर जिल्हाध्यक्ष  *मा.मोहन गवळी* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सन्मानिय पदाधिकारी *मा.सौ.उज्वलाताई महेंद्र पंडित.* समाजसेविका ‌ *सौ.नितु गायकवाड,* *श्रीमती.हिरल भट* इत्यादी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी *बियॉंड दि फेम* संस्थेचे कु.कैवल्य गायकवाड आणि कु.स्मायली भट. युवकांना मार्गदर्शन करणारी त्यांचे कलागुणांना वाव देणारी, त्यांच्यातील सुप्त गुण ओळखुन त्यांना विकसित करण्यासंदर्भात प्रयत्नशील असलेल्या *बियॉंड दि फेम* संस्थेबाबत माहिती देवुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शाळेचे मुख्याध्यापक *संतोष म्हाडसे यांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.तसेच शाळेला केलेल्या इन्व्हर्टर रुपी मदतीबद्दल शिक्षण स्वाभिमानी संघटना व श्रमिक (मु.) पत्रकार संघटनेचे विशेष आभार मानले. शाळेमध्ये नुतनीकरण केलेल्या सभागृहामध्ये माईक आणि लाऊड स्पीकरची आवश्यकता असल्याने युवा उद्योजक रवी गवळी यांनी शाळेला सदर वस्तू भेट देणार असल्याचे सांगितले तसेच सौ.उज्वलाताई महेंद्र पंडीत.यां देखील शाळेला फिरता पंखा भेट देणार आहेत. मान्यवरांच्या दानशुर वृत्तीचे कौतुक करुन शिक्षकवृंदांनी व ग्रामस्थांनी समाधानाची भावना व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

पाकिस्तान विरुद्ध लढताना घाटकोपर मधील जवान मुरली नाईक शहीद !!

पाकिस्तान विरुद्ध लढताना घाटकोपर मधील जवान मुरली नाईक शहीद !! घाटकोपर, (केतन भोज) : भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी ...