शिक्षण क्षेत्रातील सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त कैलास रघुनाथ पाचरणे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला सत्कार !!
पुणे, स्नेहा उत्तम मडावी (प्रतिनिधी) :
कैलास भाऊ पाचारणे यांनी निस्वार्थीपणे गेले छत्तीस वर्ष शिक्षण क्षेत्रात जी सेवा केली त्यासाठी त्यांच्या या शिक्षण क्षेत्रातील सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील सर होते. तसेच यावेळी उपस्थित सर्व मान्यवर मा. माजी खासदार आढळराव पाटील, खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. बाबाजी शेट काळे, बांधकाम समितीचे माजी सभापती मा. मंगलदास बांदल, चाकण शिक्षण मंडळाचे विश्वस्त मा. मोतीलालजी सांकला, चाकण शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अविनाजी आरगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट), महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सौ. राजमलाताई बुट्टे पाटील यांचे विद्यमान संचालिका, राजगुरूनगर सहकारी बँक ली व शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे सौ. अश्विनी पाचारणे आभार मानले.
सहभागी संस्था व मान्यवर, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, प्राचार्यगण - चाकण महाविद्यालयाचे प्राचार्य, पाबळ महाविद्यालयाचे प्राचार्य, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पिंगळे सर, साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ जरे सर, शैक्षणिक संघटनांचे मान्यवर, महाराष्ट्र राज्य शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मा. प्रकाशजी म्हसे, महासचिव मा. त्रिभुवन सर, विविध महाविद्यालयांतील प्रशासकीय कर्मचारीवर्ग, खेड तालुक्यातील विविध राजकीय, शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे सर्व प्रतिनिधीगण, इ. सर्व उपस्थित होते.
No comments:
Post a Comment