Tuesday, 3 June 2025

नालासोपारा टाकीपाडा येथे अनधिकृत बांधकाम सर्रास सुरूच...

नालासोपारा टाकीपाडा येथे अनधिकृत बांधकाम सर्रास सुरूच...

***अनधिकृत बांधकाम करणारा भुमाफीया ओवेस पटेल ला महापालिकेचे संरक्षण...

नालासोपारा, प्रतिनिधी : नालासोपारा पश्चिम येथिल टाकी पाडा करारी बाग येथिल इंदानी तलाव भोवती अनधिकृत बांधकाम सर्रास सुरूच आहे  

.                                                    ओवेश पटेल 

भुमाफीया ओवेस पटेल यांच्यावर अनधिकृत बांधकामाबाबत MRTP अंतर्गत गुन्हे दाखल असताना हि पाच मजली भव्य अनधिकृत इमारत उभी करण्यात आली आहे. या अनधिकृत बांधकांमावर कारवाई करण्याबाबत मागणी करून हि सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे कारवाई करण्यास टाळाटाळ करत असुन अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचे काम करत आहेत.

.                                   सहायक आयुक्त (प्रभाग क्षेत्र - ई)

इंदानी तलाव भोवती अनधिकृत बांधकाम उभे केल्यामुळे बांधकाम व्यवसायिक पटेल यांच्यावर MRTP अंतर्गत गुन्हे दाखल करून हि त्याठिकाणी ५ मजली भव्य अनधिकृत इमारत उभी करून सांडपाणी व इतर कचरा या तलाव सोडल्याने तलावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
यामुळे येथिल महापालिकेचा इंदानी तलावाचे लिलाव टेंडर कोणीच घेण्यास तयार नसल्याने महापालिकेचे दरवर्षी लाखो रूपयांचे नुकसान होते. 

तलावाचे संरक्षण व सुशोभिकरण करणे हि महापालिकेची जबाबदारी असताना हि महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे  प्रभाग समिती ई मध्ये  अनधिकृत बांधकामाचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा बांधकामांवर प्रशासनाचा अंकुश न राहिल्याने शहरात बेकायदा ईमारती, गाळे, मोबाईल टॉवर उभारले जात आहे. नियमांची पायमल्ली करून बांधकामे केली जात आहेत, 
प्रभाग समिती ई मधिल अनधिकृत बांधकामे रोखण्यात आणि बिल्डरांवर कारवाई करण्यात वसई विरार महानगरपालिकेला सपशेल अपयश आल्याने रोज अनधिकृत बांधकाम वाढत चालले आहे.

प्रभाग समिती ई  क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत सर्रास सुरू आहेत. अनधिकृत बांधकामांवर कोणतेही ठोस कारवाई होत नसल्याने नागरीकांमधुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. केवळ गुन्हे दाखल न करता पाच मजली इमारत जमीनदोस्त करून शहराला लागलेली कीड समुळ नष्ट करा. अनेकदा अशी बांधकामे वाचविण्यासाठी नागरिकांना त्याठिकाणी आणले जाते. नागरिक रहायला आल्यामुळे मानवतेच्या भूमिकेतून कारवाई करता येत नाही म्हणूनच अशा बांधकामांचे पेव फुटले आहे. त्यामुळे अशा बांधकामांमध्ये नागरिक रहायला येण्याआधी कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरीकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !!

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !! आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकड, मागणं, किंवा भेट घेण्यसाठी अनेक जन ...