स्फूर्ती फाउंडेशन वतीने एक दिवसीय रेशनकार्ड शिबिर आयोजन !!
कल्याण प., प्रतिनिधी - स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून शंकेश्वर प्रेसिडेन्सी, आर टि.ओ.जवळ, टावरीपाडा कल्याण पश्चिम येथे शुक्रवार दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते दूपारी २ या वेळेत एक दिवसीय रेशन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रेशन कार्ड ही सर्वांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या अशा कागदपत्रां पैकी एक असून या माध्यमातून सरकारी योजनेचा लाभ विविध शासकीय कार्यालयात रेशन कार्डचे महत्त्व आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिवळ्या व केशरी रेशनकार्ड कार्ड सोबत सफेद रेशनकार्डला ही आता शासकीय आरोग्य सेवेचा फायदा होणार आहे अशी घोषणा केली आहे. त्यानुसार सर्वांना या एक दिवसीय शिबिरातून नवीन रेशनकार्ड नोंदणी,नाव वाढवणे कमी करणे, रेशन दुकान व रेशनकार्ड वर पत्ता बदल, बायोमेट्रिक अशी विविध सुविधा स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष- बजरंग तांगडकर, स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख शिल्पा तांगडकर, व ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते व मार्गदर्शक शांताराम तांगडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment