वीर वाजेकर महाविद्यालय आणि केमिशिया फार्मास्युटिकल तळोजा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण अभियान !!
उरण, दि २८,'(विठ्ठल ममताबादे) :
पर्यावरण संवर्धन व शाश्वत हरित उपक्रमांच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, फुंडे यांनी केमिशिया फार्मास्युटिकल, तळोजा यांच्या सहकार्याने वृक्षारोपण मोहीम राबवली. ही मोहीम प्राणीशास्त्र आणि रसायनशास्त्र विभाग यांच्यामार्फत समझोता करार (एमओयू ) अंतर्गत राबविण्यात आली.
या अभियानात सुमारे १३५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. मधुमालती, करंज, काजू, अर्जुन, बदाम, बहावा, फणस, तामण, वड, आणि जांम यांसारख्या लोकोपयोगी व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. हे सर्व रोपे केमिशिया फार्मास्युटिकल, तळोजा यांनी सीएसआर उपक्रमांतर्गत भेट केली होती. वृक्षारोपण स्थळांमध्ये तु. ह. वाजेकर विद्यालय (फुंडे), टाकीगाव, बापदेव मंदिराजवळील वनक्षेत्र आणि इतर नैसर्गिक परिसरांचा समावेश होता. ह्या साठी केमिशिया फार्मास्युटिकलचे संचालक दीपक पवार आणि संतोष शिंदे उपस्थितीत होते. तसेच वीर वाजेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन करताना वनसंवर्धन, जैवविविधतेचे रक्षण आणि तरुणांनी पर्यावरणासाठी जबाबदारीने काम करणे यावर भर दिला.तु. ह.वाजेकर विद्यालयाचे प्राचार्य बी बी साळुंखे, थोरात मॅडम, बाबर मॅडम, पाटील सर, सदानंद म्हात्रे, डॉ. अनिल पळवे (प्रमुख, रसायनशास्त्र विभाग) डॉ. राहुल पाटील, डॉ. जी. सी. वधवा, राम गोसावी (एन एस एस अधिकारी) व डॉ. राजकुमार कांबळे (एन सी सी अधिकारी), एन एस एस स्वयंसेवक व एनसीसी कॅडेट्स, डॉ. संदीप घोडके, गजानन चव्हाण, फॉन सामाजिक संस्थेचे निकेतन ठाकूर, केमिशिया फार्मास्युटिकलचे सुमारे १५ कर्मचारी व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी पंढरीनाथ घरत, आंबवकर, सौरव सकपाळ या उपक्रमात सक्रीय सहभागी झाले.
No comments:
Post a Comment